ज्ञानव्यापीचं लोण पुण्यातही? त्या मंदिरांच्या जागी आता मशिदी; मनसेचा दावा

Pune| Gyanvyapi Mosque| Punyeshwar Mandir| MNS| अल्लाउद्दीन खिलजीचा बडा अरब नावाचा एक सरदार पुण्यावर चाल करुन आला.
Pune Latest Marathi News, Gyanvapi Mosque News, Pune MNS News
Pune Latest Marathi News, Gyanvapi Mosque News, Pune MNS News

देशात सध्या ज्ञानव्यापी मशीदीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा खटला जिल्हा न्यायालयात ट्रान्स्फर केल्यानंतर आज या प्रकरणाची (District Court) सुनावणी होणार आहे. (Pune Latest Marathi News)

काशीतील ज्ञानव्यापी मुद्दा तापला असताना आता पुण्यातही पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. या मंदिराच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारले आहेत. ज्ञान व्यापी प्रमाणे लवकरच या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी म्हटलं आहे.

Pune Latest Marathi News, Gyanvapi Mosque News, Pune MNS News
संभाजीराजेंचा शिवबंधनास नकारच शक्य! शिवसेनेच्या `प्लॅन बी` मध्ये ही तीन नावे!!

पुण्येश्वरालाही मोठा इतिहास आहे. अल्लाउद्दीन खिलजीचा बडा अरब नावाचा एक सरदार पुण्यावर चाल करुन आला. त्यावेळी त्याने भगवान शंकराची दोन मंदिर उध्वस्त केली. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरं उध्वस्त केली. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडे कुंभार वेशिजवळ आहे. तिथे आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांवर मशिदी बनवण्यात आल्या असल्याचा दावा अजय शिंदे यांनी केला आहे.

अजय शिंदे यांच्या दाव्यानंतर आता मनसे नेमकी कोणती भूमिका घेणात याकडे सर्वांच लक्ष असणार आहे. कालच्या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला. हिंदूत्त्वाचा मुद्दा लावून धरत त्यांनी भोंगे हटवण्यासाठीचं आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशाराही राज ठाकरेंनी दिला. त्याचवेळी त्यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्याचेही कारण सांगितले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिद प्रकरण जिल्हा न्यायालयाला हस्तांतरित केल्यानंतर आजपासून जिल्हा न्यायालयात या प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्यासमोर ही सुनावणी होणार असून पाच महिलांनी दाखल केलेल्या याचिकेसह इतर याचिकांवर आज सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com