बेरोजगार तरुणीचे पालकत्त्व स्वीकारत मनसेच्या रुपाली पाटील - ठोंबरेंचा पदवीधरसाठी अर्ज

पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
mns candidate rupali patil thombare files nomination papers for graduate constituency
mns candidate rupali patil thombare files nomination papers for graduate constituency

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी बुधवारी प्रातिनिधिक स्वरूपात एका बेरोजगार तरुणीचे पालकत्त्व स्वीकारत तिच्या हस्ते आज उमेदवारी अर्ज दाखल केला. 

पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिल्याने विधानभवन येथे बुधवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. ऍड.पाटील यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करत मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला.

सध्या बेरोजगारीचा प्रश्न तीव्र झाला असताना केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्ष त्याच्या सोडवणुकीसाठी काहीच पावले उचलताना दिसत नाहीत. त्यामुळे बेरोगारीच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी ऍड. पाटील या मनसेकडून पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

अनुराधा घुगे या बेरोजगार तरुणीचे पालकत्त्व स्वीकारत तिच्या हस्ते उमेदवारी अर्ज भरत त्यांनी सर्वच बेरोजगार पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा संदेश त्यांनी दिला. बेरोजगार तरुण-तरुणींसासाठी पदवीधर सन्मान योजना लागू करावी, सर्वच शिक्षण संस्थांमध्ये कमवा व शिका योजना राबवावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ऍड. रुपाली पाटील यांनी या वेळी सांगितले.

बेरोजगार तरुणी अनुराधा घुगे म्हणाली, माझे आई-वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. खूप काबाडकष्ट करून त्यांनी मला शिक्षण दिले. मात्र, आता इतके उच्च शिक्षण घेतल्यानंतर ही कुठेही नोकरी मिळत नाही. आज उतारवयात माझ्या आई-वडिलांची त्या कामातून सुटका करण्याची जबाबदारी माझी होती, मात्र नोकरी मिळत नसल्याने मी त्यांच्यावर भार बनले आहे. ताईंनी मला नोकरी मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. माझ्याप्रमाने सर्वच पदवीधरांसाठी त्या चांगले काम करू इच्छित आहेत, तरी सर्व पदवीधरांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com