पुणे पालिकेत मनसे-भाजपची युती होणार?; राज ठाकरेंचे शिलेदार खासदार बापटांच्या भेटीला...

MNS : राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण...
Bala-nandgaonkar-Raj-Thakre Latest News
Bala-nandgaonkar-Raj-Thakre Latest NewsSarkarnama

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप मध्ये चांगलीच जवळीकता बघायला मिळत आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्यामध्ये युती होणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यानंतर शिंदे गटाने भाजप सोबत युती करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. यामुळे त्यांची युती होणार हे निश्चित आहे. मात्र सोबत मनसे देखील असायला हवी, अशी अनेक भाजप नेत्यांची इच्छा असल्याचे बोलले जाते.

दरम्यान, आता राज ठाकरेंचे शिलेदार म्हणजे बाळा नांदगावकर यांनी आज (ता.६ नोव्हेंबर) पुण्याचे भाजप खासदार गिरीष बापट यांची भेट घेतली आहे. यामुळे पुण्यात मनसे-भाजप युतीची चाचपणी तर नाही ना?, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Bala-nandgaonkar-Raj-Thakre Latest News)

Bala-nandgaonkar-Raj-Thakre Latest News
Andheri Election Result : ठाकरेंच्या शिवसेनेने गुलाल उधळला..; ऋतुजा लटके विजयी

आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खासदार गिरीष बापट यांची भेट घेतली. त्यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली. यावेळी नांदगावकर यांनी बापट यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. या भेटीमुळे पुणे पालिकेत मनसे-भाजपची युती होणार का?, अशा चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. नांदगावकर यांनी बापटांची भेट घेतल्याने पुणे पालिकेसाठी मनसे- भाजप-शिंदे गट युती केल्यास काय परिस्थिती असेल याची चाचपणी तर नाही ना?, अशाही चर्चा राजकीय वर्तूळात रंगत आहेत.

Bala-nandgaonkar-Raj-Thakre Latest News
Nanded : प्रकाश आंबेडकर म्हणाले, काॅंग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही..

दरम्यान, राज ठाकरे यांचं पुण्यावर नेहमीच लक्ष राहील आहे. यामुळे ते पुण्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजप सोबत युती करण्याचा विचार करू शकतात. मात्र, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या घरी आणि इतर ठिकाणी भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. आता राज ठाकरेंचे शिलेदार म्हणजे बाळा नांदगावकर यांनीही आज पुण्याचे भाजप खासदार बापट यांची भेट घेतली आहे. यामुळे पुण्यात मनसे-भाजप युतीच समीकरणं जुळणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com