आमदारांनी घेतला बिल्डरचा चावा; येरवडा तुरूंगातील घटना

यापूर्वीदेखील आमदार चावत असल्याची तक्रार या बांधकाम व्यावसायिकाने थेट तत्कालिन गृहमंत्र्यांकडे केली होती.
आमदारांनी घेतला बिल्डरचा चावा; येरवडा तुरूंगातील घटना
येरवडा कारागृहसरकारनामा

पुणे : येरवडा कारागृहात कैदेत असलेल्या पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला कैदेत असलेल्या आमदाराने चावा घेतल्याचे सांगण्यात येत असून चावा घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकाला रूग्णालयात दाखल करावे लागल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी पुण्यातील असून ‘मोठे प्रस्थ’ असल्याने कारागृहात त्यांच्यावर नेहमीच सर्वांची नजर असते.

येरवडा कारागृह
राज्य सरकारची दोन वर्षे विकासाची नव्हे तर विनाशाची

या संदर्भातील बातमी आज ‘सामना’ दैनिकात प्रसिद्ध झाली असून राजकीय वर्तळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी पुण्यातला हा मोठा बांधकाम व्यावसायिक गेल्या तीन वर्षांपासून येरवडा कारागृहात आहे. सहकारी बँकेतील घोटाळ्यात आमदार असलेला पुण्यातील एक मोठा राजकारणीदेखील तीन वर्षांपासून येरवडा कारागृहात आहे.यापूर्वीदेखील आमदार चावत असल्याची तक्रार या बांधकाम व्यावसायिकाने थेट तत्कालिन गृहमंत्र्यांकडे केली होती, असे सांगण्यात येत आहे.

येरवडा कारागृह
मुरलीधर मोहोळांची अशीही बाजी! सर्वाधिक ‘ट्विटर फॉलोअर्स’ असणारे भारतातील महापौर

एका वर्षापूर्वीच्या त्या घटनेनंतर नुकताच पुन्हा एकदा असा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यावेळी संबंधित बांधकाम व्यावसायिकाला उपचारासाठी कारागृहातील रूग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती आहे. कारागृहात असलेले हे दोन्ही आरोपी ‘मोठे प्रस्थ’ असल्याचे त्यांच्याबाबत कारागृहात नेहमी चर्चा असते. त्यातच बांधकाम व्यावसायिक असलेले कैदी कारागृहाच्या आवारात बिनधास्त वावरत असल्यने आमदारांना त्याचा अनेकवेळा राग येतो. त्या रागातून त्यांनी बांधकाम व्यावसायिकाला चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. जाणून घेण्यासाठी

अर्थिक गुन्ह्यातील आरोपींना कारागृहात एकत्र ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, एका वर्षापूर्वी याच प्रकारची तक्रार आल्यानंतरदेखील दोन्ही आरोपींना एकत्र का ठेवण्यात येत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.दरम्यान, या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी कारागृह अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.