Sunil Tingre Birthday : आमदारांचा 'हॅपी बर्थडे' जोमात; तब्बल २७०० किलो चिकनचे वाटप, तरीही मागणी संपेना !

Chicken Distribution in Pune : अनोख्या उपक्रमासाठी कार्यकर्त्याची तीन दिवस तयारी
Yerwada Chicken Distribution
Yerwada Chicken DistributionSarkarnama

Chicken Distribution on Birthday Video Viral : आपल्या नेत्याचा वाढदिवस कार्यकर्ते कशा पद्धतीने साजरा करतील याचा काही नेम नाही. अनेक जण विविध सामाजिक कार्यक्रम राबवून आपल्या नेत्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करतात. काही जण मात्र कधीही कुणी न राबविलेले अनोखे उपक्रम राबवून तो यशस्वीही करून दाखवतात. सध्या पुण्यातील येरवडा भागात एका रुपयात एक किलो चिकन वाटप करण्यात आले. त्याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. या चिकन वाटपाचा 'व्हिडिओ व्हायरल' झाल्याने उपक्रमाची पुण्यासह राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

Yerwada Chicken Distribution
Konkan News केसरकर, तुम्ही गुर्मीत राहू नका; एकदाच काय ते होऊन जाऊ दे : भाजप जिल्हाध्यक्षांचे खुले आव्हान

पुण्यातील वडगाव शेरी (Wadgaon Sheri) मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांचा वाढदिवस सोमवारी (ता. ८) होता. टिंगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (ता. ७) येरवडा परिसरात चिकन वाटप करण्यात आले. हा उपक्रम टिंगरे यांचे कार्यकर्ते अहमद शेख यांनी राबविला. या उपक्रमासाठी त्यांनी तीन दिवसांपासून तयारी केली होती. यासाठी त्यांनी टोकन वाटप केले होते. येरवडा परिसरातील एक हजार ९५० लोकांना टोकन देण्यात आले. त्यानुसार टोकन मिळालेल्या सर्वांना प्रत्येकी एक किलो चिकन देण्यात आले. त्यासाठी फक्त एक रुपया घेण्यात आला.

Yerwada Chicken Distribution
Sudhir Mungantiwar News : असे एक कोटी ओवेसी जन्माला आले तरी मोदी बनू शकत नाही, मुनगंटीवारांची जहरी टिका !

या उपक्रमाबाबत 'सरकारनामा'शी बोलतना अहमद शेख म्हणाले, "आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांचा वाढदिवस सोमवारी होता. त्यामुळे चिकन वाटपचा उपक्रम रविवारी घेण्यात आला. तत्पुर्वी, दोन-तीन दिवसांपासून एक हजार ९५० जणांना टोकन देण्यात आले. टोकननुसार प्रत्येकी एक किलो चिकन देण्यात आले. त्यासाठी नाममात्र एक रुपया किंमत आकारण्यात आली. आमदार सुनील टिंगरे यांच्यावरील प्रेमापोटी हा उपक्रम राबविला."

Yerwada Chicken Distribution
Sharad Pawar in Nipani : भाजपमुळे कर्नाटकच्या प्रतिमेला तडा; भ्रष्टाचारावरून पवारांचा हल्लाबोल

दरम्यान, गेल्या वर्षी आमदार सुनील टिंगरे यांच्या वाढदिवासानिमित्त शेख यांनीच एका रुपायात एक लिटर पेट्रोल असा उपक्रम राबविला होता. त्यावेळी १२०० लिटर पेट्रोलचे वाटप करण्यात आले होते. त्याचीही राज्यभरात चांगलीच चर्चा झाली होती. आता शेख यांनी एका रुपयात एक किलो चिकन वाटप केले आहे. त्यासही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सध्या याचा 'व्हिडिओ व्हायरल' होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in