Vishnu Mishra : माजी आमदाराच्या मुलाला बलात्कार प्रकरणी पुण्यातून अटक

विष्णु मिश्राला पकडण्यासाठी १ लाख हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते.
Vishnu Mishra, Vijay Mishra
Vishnu Mishra, Vijay Mishrasarkarnama

पुणे : माजी आमदार विजय मिश्रा (Vijay Mishra) यांचा मुलगा विष्णु मिश्रा याला पुण्यातून अटक केली आहे. बलात्कार आणि फसवणुकीच्या प्रकरण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. विष्णु मिश्राला (Vishnu Mishra) पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखांचे बक्षिस ठेवलं होतं. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने ही कारवाई केली आहे. (Vishnu Mishra news update)

चार वेळा अपक्ष म्हणून निवडणूक आलेले विजय मिश्रा यांना २०२० मध्ये मध्यप्रदेशातून अटक केली होती. त्यांचे नातेवाईक कृष्ण मोहन तिवारी यांनी त्यांच्यावर संपत्तीबाबत आर्थिक फसवणूक, जीवे मारण्याची धमकी आदी आरोप केले आहेत.

विजय मिश्रा सध्या आग्रा येथील कारागृहात आहेत. त्यांची पत्नी रामलल्ली मिश्रा यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णु मिश्रा हा आँगस्ट २०२० पासून फरार होता. पोलिसांनी सप्टेंबर २०२० मध्ये त्याच्याविरोधात लुक आऊट वारंट काढला होता.

विष्णु मिश्रा याला अटक केल्यानंतर भदोही (उत्तरप्रदेश)चे पोलिस अधिक्षक अनिल कुमार म्हणाले, "विष्णुवर बलात्कार, फसणुकीसह अनेक गंभीर आरोप आहेत. गेल्या अनेक दिवसापासून पोलिस त्याच्या शोध घेत होती. विष्णु मिश्राला पकडण्यासाठी १ लाख हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे,"

Vishnu Mishra, Vijay Mishra
राज ठाकरेंना शिवसेनेनं सुनावलं ; स्वतःच्या मुलालाच राजकारणात पुढे आणलं, देशपांडेंना का नाही ?

ऑर्केस्ट्रामध्ये काम करत असलेल्या वाराणसी येथील एका तरुणीने आमदार आणि त्यांच्या मुलावर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. तरुणीने दावा केला आहे की, आमदार आणि त्यांच्या समर्थकांच्या भीतीने काही काळ तिने वाराणसी सोडून मुंबईला स्थलांतर केले. तरुणीच्या तक्रारीवरुन आमदारासह त्यांचा मुलगा आणि इतर तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in