Chinchwad By Election : 'आमदार जगताप हयात असतानाच भाजपची सुरू होती निवडणुकीची तयारी!'

Pimpri-Chinchwad News : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.
Pcmc News
Pcmc NewsSarkarnama

Ncp Mla Sunil Shelke News : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जगतापांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळे गुरवमध्ये झाली. या मतदारसंघाचे निरीक्षक पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ही बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी दिसून आली.

निवडणुकी संदर्भात भाजपची (BJP) चिंचवड बूथ कमिटीची तयारी दोन महिन्यांपासून सुरू होती, असा खळबळजनक दावा शेळके यांनी केला. भाजपने जगताप हयात असताना, त्यांची प्रकृतीशी झुंज सुरू असताना पोटनिवडणूक लागणार या दृष्टीने भाजपची तयारी सुरू असणे हे दुर्दैवी आहे, असा हल्लाबोल सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केला.

Pcmc News
Pimpri-Chinchwad Ncp News : तर 'चिंचवड' बिनविरोध करू, राष्ट्रवादीने घेतली महत्त्वाची भूमिका

तर लक्ष्मणभाऊ गेल्याचे दुःख आहे, पण भाजप धर्म पाळत नाही. अशी खंत शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केली. आपापल्या प्रभागात काम करायचे आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जायचे आहे, असे त्यांनी सांगितले. पिंपरी पालिकेत सत्ता हवी असेल तर ही निवडणूक महत्त्वाची आहे, असे चिंचवडमधील एक इच्छूक पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे म्हणाले. भावनेवर राजकारण चालत नसल्याने सांगत भावनेला तडा देऊन पुढे जायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपापल्या परिसरात पक्षाला लीड कसे मिळवून देता येईल, याचे नियोजन करावे लागेल, असे अपेक्षेवजा आवाहन त्यांनी केले. वारसाहक्क हा संपत्तीत असतो, राजकारणात नसतो, असा टोला दुसरे इच्छूक भाऊसाहेब भोईर यांनी लगावला. शहराचे भाजपने वाटोळे केल्याने त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे. अजितदादांना ही विधानसभेची जागा गिफ्ट द्या, आणि दाखवून द्या की आम्ही सोबत आहोत, असे आवाहन त्यांनी केले.

काहीही करा निवडून द्या, ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे म्हणत विरोधकांकडून नकारात्मक प्रचार होऊ शकतो, अशा सावध अनुभवी सल्लाही त्यांनी दिला. सर्वांनी एक होऊन काम केले पाहिजे, मतदान करून घेतले पाहिजे, तिकीट कुणालाही मिळू द्या, सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असे तिसरे इच्छूक राजेंद्र जगताप म्हणाले. भाजप एकीकडे विरोधकांना बिनविरोध निवडणूक करण्याचे आवाहन करते आणि दुसरीकडे बैठकांवर बैठका घेते, याकडे चौथे इच्छूक नाना काटे यांनी लक्ष वेधले. निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छूक असल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्याता असल्याचे सांगितले जात आहे.

Pcmc News
Chinchwad By Election : पहिल्या दिवशी पाटी कोरी; एकही उमेदवारी अर्ज चिंचवडला दाखल नाही

राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक आणि चिंचवडमधील आणखी एक इच्छूक मयूर कलाटे, अतुल शितोळे, अरुण बोराडे तसेच फजल शेख, अरुण पवार, विशाल वाकडकर, प्रशांत सपकाळ, शिवाजी पाडुळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शहर प्रवक्ते विनायक रणसुंभे यांनी प्रास्ताविक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com