Pimpri-Chinchwad Ncp News : तर 'चिंचवड' बिनविरोध करू, राष्ट्रवादीने घेतली महत्त्वाची भूमिका

Pcmc Ncp News : भाजपला इथे कोणतीही सहानुभूती मिळणार नाही आमदार शेळके यांचा दावा
Sunil Shelke, Laxmin Jagtap Ncp
Sunil Shelke, Laxmin Jagtap NcpSarkarnama

Meeting of office bearers of NCP : भाजपने कमळ चिन्ह बाजूला ठेवून उमेदवार द्यावा, आम्ही 'चिंचवड'ची पोटनिवडणूक बिनविरोध करू, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) या मतदारसंघाचे निरीक्षक पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सोमवारी दिले. तसेच भाजपला इथे कोणतीही सहानुभूती मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) राष्ट्रवादीची बैठक जगतापांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळे गुरवमध्ये झाली. त्यावेळी शेळकेंनी भाजपला हे आव्हान दिले. भाजपची (BJP) चिंचवड बूथ कमिटीची तयारी दोन महिन्यांपासून सुरू होती, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. भाजपने जगताप हयात असताना, त्यांची प्रकृतीशी झुंज सुरू असताना पोटनिवडणूक लागणार या दृष्टीने भाजपची तयारी सुरू असणे हे दुर्दैवी आहे.

Sunil Shelke, Laxmin Jagtap Ncp
Eknath Shinde Group : शिवतारेंच्या कट्टर समर्थकावर मुख्यमंत्र्यांनी सोपवली राज्याची मोठी जबाबदारी

असे राजकारण कुठल्या राजकीय संस्कृतीला धरून आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. पक्षाचा या निवडणुकीत विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अंतर्गत गटबाजीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पक्षाची सत्ता गेली, विकासकामे पोहोचविण्यात आपण कमी पडलो, असा घरचा आहेर सुद्धा त्यांनी दिला. मावळची जनता माझ्यापाठीमागे उभी राहते, मग पिंपरी-चिंचवडची का नाही, असा रोकडा सवाल त्यांनी विचारला.

Sunil Shelke, Laxmin Jagtap Ncp
Anil Parab vs Kirit Somaiya : परब आक्रमक झाले अन् म्हाडाने नांगी टाकली; सोमय्यांच्या विरोधात थोपडले दंड

भाजपच्या गेल्या वर्षातील पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचारावर आवाज उठवला पाहिजे, संघटनात्मक काम केले पाहिजे. मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे, आपला अजेंडा पोचवला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. मतभेद, गैरसमज बाजूला ठेवा. पक्षासोबत गद्दारी करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com