भेगडेंची पोलिस सरक्षणाची मागणी; आमदार शेळके म्हणतात केसालाही धक्का लागणार नाही

MLA Sunil Shelke : मावळात सुरक्षेचे राजकारण पेटले
Sunil Shelke, Sanjay Bhegade
Sunil Shelke, Sanjay BhegadeSarkarnama

MLA Sunil Shelke : राज्याचे माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी भाजप (BJP) आमदार बाळा भेगडे यांनी क्रशर व्यावसायिकांकडून जीवाला धोका असल्याने आपली सुरक्षा वाढवावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यावर भेगडेंच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी हमी मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार सुनिल शेळके आज दिली.

स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी आणि चर्चेत राहण्याकिरता सुरू असलेला हा खटाटोप, तर नाही ना असा टोलाही त्यांनी भेगडेंना लगावला आहे. पुणे जिल्ह्यातील गौण खनिज व्यावसायिकांच्या अवैध उत्खननाविरोधात हरित लवादात केस दाखल केल्याने या लोकांपासून धोका निर्माण झाल्याचा दावा भेगडे यांनी पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्याचा समाचार शेळकेंनी लगेच घेतला. आपण मागील दहा वर्षांपासून आमदार होता.

Sunil Shelke, Sanjay Bhegade
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; १० जणांना वाहनाने चिरडले

त्या वेळी कोणी शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचे तुम्हाला आढळले नाही. परंतू, आता राज्यातील सत्तांतरानंतर अचानक हे व्यावसायिक अवैधरित्या व्यवसाय करीत असल्याचा दृष्टांत तुम्हांला कसा काय झाला. स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याकरिता व चर्चेत राहण्यासाठीचा हा खटाटोप, तर नाही ना, असा प्रश्न शेळके यांनी विचारला आहे.

राजकीय हव्यासापोटी पुणे जिल्ह्यातील क्रशर व्यावसायिकांना माफिया हा शब्द वापरणे योग्य नाही, असा सल्लाही त्यांनी भेगडेंना दिला आहे. क्रशर व्यावसायिक माफिया नसून कायदेशीरपणे शासकीय नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करणारे स्थानिक आहेत. त्यामुळे तुमच्या जीवाला कुठलाही धोका असणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे आपल्या मामांना (भेगडे) शेळकेंनी आश्वस्त केले आहे.

Sunil Shelke, Sanjay Bhegade
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्येच का जातात?; राज ठाकरेंचा सवाल...

त्यामुळे असा पत्रव्यवहार करून क्रशर व्यवसायिकांची बदनामी करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. करोडो रुपयांचे कर्ज घेऊन पुणे जिल्ह्यात क्रशर व्यवसाय करणारे स्थानिक भूमिपुत्र असून ते गुन्हेगार नाहीत, याचे भान बाळा भेगडे यांना असायला हवे. स्थानिक व्यावसायिकांवर असे आरोप करताना विचार करायला हवा होता. असेही शेळकेंनी सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in