Maval : मावळातील स्थानिकांच्या हक्कासाठी शेळके-भेगडे सरसावले...

Maval : तर २ डिसेंबर रोजी तळेगाव एमआय़डीसी बंद केली जाईल.
Sunil Shelke, Sanjay Bhegade, Maval Latest News
Sunil Shelke, Sanjay Bhegade, Maval Latest NewsSarkarnama

पिंपरी : लोणावळा (ता.मावळ) येथील `वेट अॅन्ड जॉय वॉटर पार्क`मधून कामावरून कमी केलेल्या स्थानिक पन्नास कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी यापूर्वी आंदोलन केले होते.

तर, आता मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी मावळातीलच नवलाख उंबरे येथील लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीने काढून टाकलेल्या २३६ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी लढा उभारला आहे. (Sunil Shelke, Sanjay Bhegade, Maval Latest News)

Sunil Shelke, Sanjay Bhegade, Maval Latest News
राऊत तुरूंगाबाहेर.. देशमुखांना दिलासा आता मलिकांना जेल की बेल?

पुन्हा कामावर घेण्याकरिता लार्सन अॅन्ड टुब्रोच्या कामगारांचे गेल्या ४२ दिवसांपासून पुण्यातील कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे. त्यांना त्यांचा न्याय हक्क १ डिसेंबरपर्यंत मिळाला नाही, तर २ डिसेंबर रोजी तळेगाव एमआय़डीसी बंद केली जाईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस कंपनी व्यवस्थापन सर्वस्वी जबाबदार राहील,असा इशारा आमदार शेळकेंनी दिला आहे.

यापूर्वी त्यांनी तळेगाव येथील जनरल मोटर्स आणि कान्हे येथील महिंद्रा लॉजिस्टीक कंपनीच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. तर, माजी आमदार भेगडेंनी एम्आयडीसीने अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा त्यांना योग्य तो मोबदला मिळावा म्हणून आंदोलन केले होते.

कामगार संघटना स्थापन केली म्हणून आमच्या राज्याबाहेर बदल्या केल्याचे नवलाख उंबरेतील लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीने कारवाई केलेल्या देवा शिरसाठ या कामगाराने 'सरकारनामा'ला सांगितले. कंपनीत भारतीय कामगार सेनाप्रणित कामगार संघटना स्थापन केल्याने आम्हा २३६ कामगारांवर कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.यापूर्वी शिवक्रांती कामगार संघटनेचा युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनी व्यवस्थापनाने हाणून पाडला होता,अशी माहिती त्यांनी दिली.

Sunil Shelke, Sanjay Bhegade, Maval Latest News
अजितदादा शिंदे गटाचे उमेदवार झालेल्या संजय पवार यांचे काय करतील?

तसेच, कंपनीत युनियनच स्थापन करू दिली जात नसल्याचा दावा त्यांनी केला. कंपनीत एकही स्थानिक हा कायम कामगार नसून सर्व कंत्राटी आहेत,असे त्यांनी सांगितले. हाजीरा, गुजरात येथे बदली केलेल्या कामगारांना तेथे कामही देण्यात आले नाही. परिणामी ते परत आले, असे ते म्हणाले.

L&T कंपनीने आडमुठेपणाची भूमिका घेतली असल्याचे शेळके यासंदर्भात म्हणाले, स्वतःच्या हितासाठी, नफेखोरीसाठी,अशा पद्धतीने काम करणाऱ्या कंपन्यांविरोधात लढा उभारण्याची आता वेळ आली आहे. कुठल्याही कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरुन मुजोरीपणा करण्याची हिंमत दाखवू नये,आमच्या संयमाची परिक्षा पाहू नये,असा इशारा देखील त्यांनी दिला. स्थानिक भूमीपूत्रांसाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

दरम्यान,भाजप, (BJP) मनसे आदींनींही या आंदोलनाला समर्थन दिले आहे. त्यामुळे हुरुप वाढलेल्या या कामगारांनी नोकरीवर घेईपर्यंत कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेरील ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र यासंदर्भात लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क होऊ शकला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com