ग्रामपंचायत झाली आता शेळके जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या तयारीला

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) नऊ ग्रामपंचायतीपैकी सात ठिकाणी घवघवीत यश मिळविले.
Sunil Shelke
Sunil ShelkeSarkarnama

पिंपरी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) नऊ ग्रामपंचायतीपैकी सात ठिकाणी घवघवीत यश मिळविले. तेथील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी आज (ता.२४) वडगाव मावळ येथे सत्कार केला. यावेळी आगामी जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग त्यांनी फुंकले.

मावळ तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीचा विजय नक्की आहे, असा आत्मविश्वास शेळकेंनी या सोहळ्यात व्यक्त केला. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील संघर्षामुळे दोन ग्रामपंचायतीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. हे हेरून आपल्यातच संघर्ष करु नका, नीट रहा असा सल्ला त्यांनी आगामी निवडणुकीसाठी दिला. त्यावेळी प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.

Sunil Shelke
शिंदे-फडणवीसांनी आदित्य ठाकरेंची कोंडी केली; मात्र, त्यांच्याच दोन नेत्यांचे टेन्शन वाढले

मात्र, पक्षश्रेष्ठींचे न ऐकणाऱ्यांची आणि पक्षादेश डावलणाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांमुळे आपल्या काही सदस्य व सरपंचांचा पराभवाला सामोरे जावे लागले. सेच खरेदी विक्री संघ व खादीग्राम उद्योग निवडणुकीतही पराभव झाला. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षादेश न पाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील मंजूर कामे तसेच चालू कामांना शिंदे-फडणवीस सरकारने दिलेल्या स्थगितीवर विकासकामात राजकारण करून निधी न अडविण्याचे आवाहन शेळके यांनी यावेळी केले. मागील अडीच वर्षात अजित पवार यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी १२०० कोटी रुपयांचा निधी आणला. आता, तर राज्यात तुमचे सरकार आहे. मावळातील विकासासाठी किमान ६०० कोटी, तरी आणा. मी तुमचा इथेच सत्कार करेल, असा टोला त्यांनी आपले विरोधक आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांना नाव न घेता लगावला.

Sunil Shelke
भुमरेंचे टेन्शन वाढणार : आदित्य ठाकरेंचा दौरा फलदायी ठरला; दोन मोठी गावे शिवसेनेने हिसकावली!

मावळ तालुक्यातील विकासकामांसाठी ४७ कोटी रुपये आणल्याचा दावा माजी आमदार भेगडेंनी नुकताच केला होता. त्याचा समाचार शेळकेंनी यावेळी घेतला. वडगाव मावळचे ग्रामदैवत पोटोबा महाराजांवर हात ठेवून सांगा की आम्ही हा निधी आणला, असे आव्हान त्यांनी दिले. तसे तुम्ही केले तर मी माफी मागेन, असेही ते म्हणाले. आता सत्ता नसली, तर गावागावामध्ये जो काही शब्द दिला होता तो पूर्ण करणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तालुक्यात निवडणूक झालेल्या सर्व नऊ ग्रामपंचायतीना विकासकामांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com