आमदार सातपुते म्हणाले;मिटकरी हे तर बाजारू विचारवंत

प्रचारसभेतील पिसाळलेली भाषा बंद करा.
satpute.jpg
satpute.jpg

पुणे : विजय हा विजय असतो. प्रचारात भाषा नीट वापरायची असते तरच विजय होत असतो. प्रचारसभेतील पिसाळलेली भाषा बंद करा. पंढरपूर-मंगळवेढ्यातील जनतेने तुमचे तोंड काळे केले आहे. ते पुसून घ्या नीट आणि पराभव पचवायला शिका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर केली आहे. आमदार मिटकरी हे बाजारू विचारवंत आहेत, अशी टीकदेखील आमदार सातपुते यांनी केली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आमदार मिटकरी यांनी व्हिडीओ प्रसारीत करून भारतीय जनता पार्टी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आमदार सातपुते यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे.पंढरपूरमधील या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला. भारतीय जनता पार्टीचे समाधान अवताडे निवडून आहे. महाविकास आघाडी एकत्र असूनही भालके यांचा पराभव झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असल्याच्या पाश्‍र्वभूमीवर आमदार मिटकरी यांचा व्हीडीओ प्रसारीत झाल्याने आमदार सातपुते यांच्याकडून त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटली.

पंढरपूर-मंगळवेढ्यातील विजयानंतर राज्यातील सरकार पाडण्याचे स्वप्न विरोधी पक्षनेते नेवेंद्र फडणवीस यांना पडू लागले आहे, अशी टीका आमदार मिटकरी यांनी या व्हीडीओच्या माध्यमातून केली आहे. आमदार मिटकरी म्हणाले, ‘‘ एका छोट्याशा निसटत्या विजयाने सरकार पाडण्याची भाषा करू नका. बंगालमधील जनतेने तुमचे थोबाड चांगलेच रंगवले आहे. त्यामुळे करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा करू नका. येत्या निवडणुकीत तुमचा संपूर्ण पराभव आम्ही करणार आहोत. अहंकाराची भाषा बोलू नका. अशा अहंकारातून आलेली मस्ती जिरत असते हे पश्‍चिम बंगालच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे हे लक्षात घ्या.’’

मिटकरी यांच्या या विधानानंतर आमदार सातपुते यांनी आक्रमकपणे त्याला उत्तर दिले आहे. आमदार सातपुते यांच्या विधानाला आता आमदार मिटकरी यांच्याकडूनही उत्तर अपेक्षित आहे. परिणामी या पुढच्या काळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून या दोन तरूण आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. आमदार मिटकरी यांना विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आग्रहाखातर विधान परिषदेवर घेण्यात आले आहे तर आमदार सातपुते हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक मानले जातात. ते भाजपाचे सर्वात तरूण आमदार आहेत.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com