काँग्रेसच्या विजयासाठी तीन आमदारांची कसोटी

आयपीएस आणि आयएएसही या स्पर्धेत खेळणार आहेत. क्रिकेटनामा स्पर्धेचा प्रारंभ आजपासून पुण्यात होत आहे.
Sanjay Jagtap, Amit Jhanak, Sangram Thopte
Sanjay Jagtap, Amit Jhanak, Sangram Thopte sarkarnama

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. 'सरकारनामा'च्या वतीने नेत्यांसाठी 'क्रिकेटनामा' स्पर्धा भरविण्यात आली आहे. तापलेल्या राजकीय वातावरणात ही स्पर्धा थंड हवेची झुळूक देणारी ठरत आहे. क्रिकेटनामा स्पर्धेचा प्रारंभ आजपासून पुण्यात होत आहे. `सनी`ज वर्ल्ड` येथे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. सामना पाहण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. (Sarkarnama cricketnama matches in Pune)

भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांच्या संघाबरोबरच आयएएस आणि आयपीएस अधिकारीही 'क्रिक्रेटनामा'साठी सज्ज झाले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte), शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे आमदार अमित झनक, सासवडचे आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी भाजपला हरविण्यासाठी डावपेच आखले आहेत.

Sanjay Jagtap, Amit Jhanak, Sangram Thopte
सुजय विखे, पडळकर, राम सातपुते भाजपची तगडी टीम मैदानात उतरणार

एकमेकांवर टीका करीत फटकेबाजी करणारे नेतेमंडळी आज कुणाची विकेट घेणार, कुणाला गुगली टाकणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे. `सनी`ज वर्ल्ड` येथे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. सामना पाहण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Sanjay Jagtap, Amit Jhanak, Sangram Thopte
मिलिंद नार्वेकर थेट भाजप, राष्ट्रवादीशी पंगा घेणार

पाषाण रोड, सूस येथील 'सनीज् वर्ल्ड'च्या मैदानात हे बाॅक्स क्रिकेटचे सामने रंगणार आहेत. ता.२८ व २९ मे रोजी दुपारी ४ ते रात्री १० या वेळात हे सामने खेळवले जाणार आहेत. सरकारनामा, ई-सकाळ, साम टिव्ही या तिन्ही वेब पोर्टलच्या फेसबुक पेजवरून तसेच यु ट्यूब चॅनेलवरुन या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे.

Sarkarnama cricketnama matches in Pune
Sarkarnama cricketnama matches in Punesarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस संघ : राष्ट्रवादीच्या संघात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह आमदार आशुतोष काळे, अनिकेत तटकरे, सुनील टिंगरे हे आमदार खेळणार आहेत.

काँग्रेस संघ : काँग्रेसच्या संघात आमदार संग्राम थोपटे, अमित झणक, संजय जगताप आदी मैदानात उतरणार आहेत.

भाजप संघ : भाजपकडून सुजय विखे, गोपीचंद पडळकर, महेश लांडगे, सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते आपले कसब दाखवणार आहेत.

शिवसेने संघ : शिवसेनेकडून सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार ओम राजेनिंबाळकर, धैर्यशील माने, आमदार अंबादास दानवे, सचिन अहिर संघात असतील.

मनसेकडून आमदार राजू पाटील यांच्यासह अनेक नेते उतरणार आहेत. आयएएस संघाचे नेतृत्व पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि आयपीएस संघाचे नेतृत्व पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com