तुमच्यासारखं कधीतरी पोपटपंचीसाठी सासवडला येत नाही : आमदार जगतापांचे शिवतारेंना प्रत्यूत्तर

Sanjay Jagtap | Vijay Shivtare : सासवड दुहेरी हत्याकांड आमदार जगतापांनी दडपलं पण कर्तबगार देशमुखांनी बाहेर काढलं, असा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला होता.
Sanjay Jagtap- Vijay Shivtare
Sanjay Jagtap- Vijay Shivtare Sarkarnama

सासवड : सासवड येथे दोन कचरावेचकांचा हातगाडीवाल्याच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूची घटना निंदनीय आहे. पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपीला अटक केली असून कायद्यानुसार शिक्षा होईल, असे मत आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले. यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांचे खंडनही जगताप यांनी केले. (MLA Sanjay Jagtap Latest News)

याशिवाय माजी आमदारांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोटे असल्याचे सांगत आमदार जगताप म्हणाले, या घटनेनेशी अथवा ती दडपण्यात माझा आणि माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याचा कसलाही संबंध नाही. याउलट त्यांनी केलेल्या आरोपांनुसार आमचे कॉल डिटेल्स चेक करून त्याचा अहवाल जनतेसमोर मांडावा, असे माझे मत आहे, असे प्रतिआव्हानही आमदार जगताप यांनी दिले आहे.

Sanjay Jagtap- Vijay Shivtare
सासवड दुहेरी हत्याकांड आमदार जगतापांनी दडपलं पण कर्तबगार देशमुखांनी बाहेर काढलं

आमदार जगताप पुढे म्हणाले, शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय बाबींबद्दलच्या आरोपांबाबत माजी आमदारांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उत्तरे घेणे आवश्यक आहे. सासवड व जेजुरी पोलीस ठाण्याच्या कारभारात माझा अथवा माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याचा हस्तक्षेप होत नाही. तेथील कामकाज हे कायद्यानुसार चालते. आम्ही जनतेच्या भल्यासाठी झटतो. पुरंदर हवेलीच्या सर्वांगिण विकासासाठी अहोरात्र काम करत आहे. तुमच्यासारखं कधीतरी फक्त वेळ मिळाल्यावर पोपटपंची करण्यासाठी सासवडला येत नाही, असा चिमटाही जगताप यांनी काढला.

काय म्हणाले होते विजय शिवतारे?

सासवड येथील दुहेरी हत्याकांड प्रकरण पोलिसांवर दबाव आणून आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी दडपले होते, परंतु कर्तबगार पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh) आणि हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोलेंच्या तत्परतेने दोन्ही हत्या प्रकरणाला वाचा फुटली, असे खळबळजनक दावा विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला.

याबाबत शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना हाताशी धरून हे मृत्यू उपासमारीने झाल्याचा निष्कर्ष काढला होता. कसलाही तपास न करता पोलिस आणि डॉक्टर लोकांनी ही फाईल बंद करून टाकली होती. पण काही सुजाण लोकांनी याबाबत मला आणि पोलीस अधिक्षकांना गोपनीय माहिती दिल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले. (Vijay Shivtare Latest News)

सासवड आणि जेजुरी पोलीस ठाण्याच्या कारभारात आमदार आणि त्यांचा एक सहकारी प्रचंड ढवळाढवळ करीत असून पोलिस त्यांच्या दबावाखाली निष्पाप नागरिकांना भरडून काढत आहेत. तालुक्याची स्थिती भीषण झालेली असून गरिबांना वाली उरलेला नाही. तालुक्याचा बिहार होऊ लागला आहे, असेही शिवतारे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com