Ravindra Dhangekar : ‘भाजपचा पैसा जनतेचा खिशात; पण धंगेकर जनतेच्या मनात होता’ : नूतन आमदाराची इंदापुरात पेढेतुला

भारतीय जनता पक्षाचा २८ वर्षांचा गड उद्‌ध्वस्त करणारे आमदार रवींद्र धंगेकर यांची इंदापूर तालुक्यातील गागरगाव येथे पेढेतुला करण्यात आली.
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस झाला. वाटप झालेला पैसा जनतेच्या खिशात राहिला; पण रवींद्र धंगेकर मनात होता. तसेच, महाविकास आघाडीची ताकद यामुळे माझा विजय झाला, असे प्रतिपादन कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचा २८ वर्षांचा गड उद्‌ध्वस्त करणारे आमदार रवींद्र धंगेकर यांची इंदापूर तालुक्यातील गागरगाव येथे पेढेतुला करण्यात आली. (MLA Ravindra Dhangekar felicitated in Indapur)

इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील काळेलवस्ती येथे रवींद्र धंगेकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, दीपक जाधव, प्रताप पाटील, शुभम निंबाळकर, सचिन सपकळ,अतुल झगडे, निवास शेळके आदी उपस्थित होते. भाजपने कसबा विधानसभेसाठी वापरलेला भरमसाठ पैसा आगामी काळात घातक असून प्रत्येक निवडणुकीमध्ये हीच पद्धत पुढे चालवली जाण्याची शक्यता आहे, असेही धंगेकर म्हणाले.

Ravindra Dhangekar
Mahesh Landge : समर्थकांनाच या कारणासाठी नको आहेत महेश लांडगे पुन्हा शहराध्यक्षपदी

माजी मंत्री भरणे म्हणाले की, कसबा निवडणुकीच्या निकालाची दखल दिल्लीने घेतली आहे. रवींद्र धंगेकर संघर्षातून तयार झालेले नेतृत्व आहे. यामुळे आगामी काळात त्यांना मोठी जबाबदारी मिळेल. मिळालेल्या खुर्चीचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेसाठी झाला पाहिजे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

इंदापूरबाबत बोलताना जनतेने ज्यांना घरी बसविले, ते खोटे बोलून कामाचे श्रेय घेतात. मी आमदार म्हणून एवढे काम केले आहे की त्यांना आता कामं करायची गरज नाही. यापुढे ही विकासासाठी मी खंबीर आहे. फक्त कामात काटे, अडचणी आणू नका, असे आवाहन भरणे यांनी आपल्या विरोधकांना केले.

Ravindra Dhangekar
Sanjay Raut : हक्कभंग नोटिशीला राऊतांचे सडेतोड उत्तर ; 'हा सत्ताधाऱ्यांचा डाव...'

रवींद्र धंगेकर यांची पेढे तुला...

इंदापूर तालुक्यातील गागरगाव येथील बाळासाहेब नरळे, कैलास नरळे यांनी धंगेकर हे आमदार व्हावेत; म्हणून गावच्या मारुतीला नवस बोलला होता. त्यानुरूप रवींद्र धंगेकर आमदार झाल्याबद्दल त्यांची पेढे तुला करून त्यांच्या वजन इतके पेढे वाटप करण्यात आले.

Ravindra Dhangekar
Chhatrapati Sambhajinagar : पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा? नऊ ठिकाणी ईडीची छापेमारी

पुढच्या हंगामपासून उसाची काळजी करण्याची गरज नाही

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसबिल मिळत नसल्याबाबत उपस्थितींनी विचारले असता, यावर्षीबद्दल बोलत नाही. पण, पुढील वर्षी एकही शेतकऱ्याचे उसाचे टिपरू शिल्लक राहणार नाही. तसेच, चांगला दामही मिळेल अशी ग्वाही आमदार भरणे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com