आमदार राहुल कुलांनी रमेश थोरातांना त्यांच्या गावात सहकार्य केले..

दौंडमधील नेत्यांच्या गावातील वाद टळले..
ramesh thorat-rahul kul
ramesh thorat-rahul kul

राहू  : पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार रमेश थोरात यांच्या खुटबाव गावात ग्रामपंचायतीच्या 15 पैकी 13 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

थोरात समर्थकांमध्ये दोन जागेवरती मैत्रीपूर्ण लढती रंगणार आहेत. या निवडणुकीमुळे बिनविरोध निवडणूक करण्याच्या परंपरेला अंशतः यश आले आहे. विशेष म्हणजे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार राहुल कुल गटाने सहकार्य केले आहे.

या निवडणुकीसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात,  जिल्हा परिषदचे  माजी ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब ढमढेरे, माजी सरपंच दशरथ थोरात, शिवाजी थोरात, नानासाहेब थोरात, संजय थोरात, अरुण थोरात, जी. के. थोरात, सुदाम थोरात, नवनाथ थोरात , दिगंबर थोरात, आर. डी .थोरात, संतोष थोरात, शरद शेलार, कोंडीबा थोरात, चेतन थोरात, शिवदास थोरात, अशोक पवार  यांनी भूमिका बजावली.

बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य पुढीलप्रमाणे-प्रभाग 1-स्वप्निल बाळासो चव्हाण. प्रभाग 2-राजेंद्र दत्तोबा थोरात, कलावती अविनाश चव्हाण, कोमल किरण थोरात. प्रभाग 3-निखिल मच्छिंद्र थोरात, सीमा दत्तात्रय शेलार, नाना पोपट डोमाळे. प्रभाग 4-मीना गणेश शितोळे, रघुनाथ ज्ञानदेव फणसे, सिंधुताई बाळासाहेब थोरात. प्रभाग 5-पुष्पा प्रकाश सकट.

गलांडवाडी ग्रामपंचायत सातव्यांदा बिनविरोध..

आमदार आदर्श ग्राम गलांडवाडी (ता.दौंड) ग्रामपंचायत स्थापनेपासुन आतापर्यंत सातव्यांदा  बिनविरोध झाली आहे. आमदार राहुल कुल कुल व माजी आमदार रमेश थोरात  गटातटाच्या पार्श्र्वभूमीवर स्थानिक पातळीवर किरकोळ राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध केली. 

ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी  कात्रज दूध संघाचे संचालक नीळकंठ शितोळे, बाजार समितीचे संचालक उत्तमराव ताकवले, ज्ञानदेव कदम, संजय कदम, खंडेराव कदम, विजय पवार, डॉ. राजेंद्र कदम, पोलिस पाटील बाळासाहेब कदम, उमेश देवकर, बाळासाहेब भापकर, गोरख मांढरे, पोपटराव शिंदे, बाळासाहेब शितोळे, दत्तात्रय कदम ,ज्योती शितोळे,भारती कदम,पल्लवी कदम, पोपटराव कदम आदी प्रतिष्ठित गाव पुढाऱ्यांनी प्रयत्न केले.

बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे-प्रभाग 1- वर्षा प्रमोद देवकर, प्रकाश शरद शेलार, रेश्मा सुमित चव्हाण. प्रभाग 2- गजानन विठ्ठल कदम, गौरव पोपट चव्हाण, कल्पना संजय जाधव. प्रभाग 3 -रमेश बबन पासलकर, सुनंदा संजय पवार, जयश्री अक्षय थोरात. बिनविरोध निवडीनंतर तहसीलदार कार्यालयासमोर सर्व सदस्य व गावातील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विजय जल्लोष साजरा केला.

हातवळण ग्रामपंचायत देखील बिनविरोध 

वरवंड : दौंड तालुक्यातील हातवळण येथील स्थानिक दोन्ही राजकीय गटाने एकत्रीत येवून ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुकीत चक्क बिनविरोधचा झेंडा लावून एक वेगळा आदर्श ठेवला.ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी २० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल होते.

मात्र,सोमवारी (ता.४) माघारीच्या दिवशी चक्क अकरा जणांनी अर्ज माघार घेतल्याने सर्वच नऊ जागा बिनविरोध होण्यास यश आले.बिनविरोध निवडीनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित जल्लोष केला. येथील ग्रामपंचायतीचे तीन प्रभाग असुन एकुण नऊ सदस्य संख्या आहे.मागील काही दिवसापासुन गावातील स्थानिक आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात या दोन्ही गटाच्या गट प्रमुखांनी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याचे संकेत दिले होते.

त्यानुसार दोन्ही गट प्रमुख व गावातील सामाजीक कार्यकर्त्यांची चर्चा सुरु होती. मात्र,निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी अपक्षांसह एकुण वीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अखेर माघारीच्या दिवशी दोन्ही गटाने गावासाठी घेतलेली भुमिका व उमेदवारांनी दाखविलेला समंजसपणा यामुळे दोन्ही गटात जागा वाटपात तडजोड झाली. शेवटी सोमवारी वीस पैकी अकरा जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सर्व नऊ जागा बिनविरोध झाल्या अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बाबर यांनी दिली.

नवनिर्वाचित सदस्यांची नावे पुढीलप्रमाणेः प्रभाग क्रमांक एक-योगेश फडके,चैताली फडके,अनिल गवळी. प्रभाग क्रमांक दोन- सखाराम शिंदे,प्रगती फडके,सुवर्णा फडके. प्रभाग क्रमांक तीन- रमेश जगताप, पूनम गांदले, प्राजक्ता कोऱ्हाळे. 

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जिल्हा दुध संघाचे माजी संचालक नानासाहेब फडके, माजी उपसरपंच रमेश जगताप, माजी सरपंच सागर फडके,सामाजीक कार्यकर्ते मंगेश फडके आदी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. याबाबत दोन्ही गटाचे प्रमुख माजी सरपंच सागर फडके व रमेश जगताप म्हणाले, ``गावच्या विकासासाठी व हितासाठी निवडणुक बिनविरोध होणे अनिवार्य होते.याचा आम्ही दोन्ही गट प्रमुखांनी विचार केला. समंजसपणाने तोडगा काढला. गावातील विकासासाठी आम्ही एकत्रित काम करणार आहोत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com