Money Laundering : मोठी बातमी : आमदार राहुल कुल यांच्यावर मनी लाँड्रींगचा आरोप ; राऊतांचे फडणवीसांना पत्र

MLA Rahul Kul Money Laundering: ५०० कोटींचा मनी लाँड्रीग केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
Rahul Kul, Sanjay Raut
Rahul Kul, Sanjay Raut Sarkarnama

Sanjay Raut Letter To Devendra Fadnavis: दौंड येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात भष्ट्राचार झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

आमदार राहुल कुल यांनी या कारखान्यात ५०० कोटींचा मनी लाँड्रीग केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राहुल कुल यांची चौकशी ईडी आणि सीबीआय मार्फेत करावी, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

Rahul Kul, Sanjay Raut
Bachchu Kadu : बच्चू कडूंमुळे विधानसभेत गदारोळ ; राज्यपालांनी भाषणं थांबवलं..

२०१६ ते २०२२ या कालावधीत गळीत हंगाम बंद असताना खुल्या बाजारात साखरेची विक्री केली असल्याचा असा आरोप राऊतांनी फडणवासींना पाठविलेल्या पत्रात केला आहे. कारखान्याने बॅंकांचे थकीत कर्ज बुडवले, असा आरोपही राऊतांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने शनिवारी छापेमारी केली आहे. कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुश्रीफ यांची सध्या चौकशी सुरु आहे. नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने मुश्रीफ यांना समन्स बजावलं आहे. आज (सोमवारी) मुश्रीफ यांना हजर राहण्याचा आदेश ईडीनं दिला आहे.

Rahul Kul, Sanjay Raut
Money Laundering कायद्यात बदल ; PMLA नुसार आता लष्करी अधिकारी, न्यायाधीशही...

राऊतांनी राहुल कुल यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. यावर फडणवीस राऊतांना काय उत्तर देतील, हे लवकरच समजेल.

काल संजय राऊत यांनी टि्वट करीत राष्ट्रीय तपास यंत्रणा, भाजपवर टीका केली होती. "आपणही एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्र फडणवीसांकडे पाठवणार आहोत," असे संजय राऊतांनी टि्वटमध्ये म्हटलं होते. राऊतांनी टि्वटमध्ये हसन मुश्रीफ यांचा फोटो पोस्ट केला आहे.

Rahul Kul, Sanjay Raut
Maharashtra Politics : रामदास आठवलेंच्या एका वाक्याने शिंदे गटाचे खासदार लोखडेंचं टेन्शन वाढलं

फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात राऊत म्हणतात...

आपल्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे व त्याबद्दल आपले अभिनंदन. भारतीय जनता पक्षाचे काही नेते जे आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात, ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांचे साखर कारखाने याबाबत भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत व या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला जातो.

भ्रष्टाचारास धर्म व राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे, या मताचा मी आहे. पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखाना लि. ने गेल्या काही वर्षांत केलेल्या भ्रष्टाचार – गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे ५०० कोटी रुपयांचे ‘मनी लाँडरिंग’ आहे.

कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे व तपास यंत्रणांच्या धाडी त्या संदर्भात पडत आहेत. पण दौडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे.

भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे मुख्य सुत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसलेत.

जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात झाली आहे. हे सर्व प्रकरण तत्काळ ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी.

“मुश्रीफ यांच्या सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात ED ची कारवाई सुरू आहे. महात्मा पोपटलाल त्यावर बेंबीच्या देठापासून ओरडत आहे. अशा डझनावर साखर कारखान्यात जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. ed येथे गप्प का? उद्या एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्रजीकडे पाठवीत आहे, असं ट्वीट करत संजय राऊतांनी काल हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतानाचा एक फोटोही पोस्ट केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com