छत्रपती संभाजी स्मारकावरुन आमदार पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा...

MLA Ashok Pawar : महाराजांच्या स्मृतीस्थळाबाबत सरकारकडून टाळाटाळ होत असेल तर आपण गप्प बसणार नाही.
MLA Ashok Pawar Latest News
MLA Ashok Pawar Latest News Sarkarnama

शिक्रापूर : मविआ (Mahavikas Aghadi) सरकारने केवळ आपल्या पाठपूराव्याने २७० कोटींचा निधी महाराष्ट्राचे वैभव छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जागतिक दर्जाच्या स्मारक उभारणीसाठी मंजुर केले होते. मात्र सत्तेत आल्यावर हे काम रद्द केले नसल्याचे सांगणा-या शिंदे-फडणवीस सरकारने त्यांच्या पहिल्याच अधिवेशनात शंभूभक्तांची साफ निराशा करुन इतर आमदारांच्या मतदार संघांना मात्र निधी उपलब्धता करुन दिली.

याबाबत आपण सभागृहात हा विषय उपस्थित केला होता. तरीही शिंदे-फडणवीस सरकारने याबाबतीत तात्काळ निधी उपलब्धता न केल्यास संपूर्ण शिरुर-हवेली मतदार संघासह आपण आंदोलनात उतरु, असा आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी सज्जड दमजच दिला. (MLA Ashok Pawar Latest News)

MLA Ashok Pawar Latest News
संजय पाटलांची ख्याती योगी आदित्यनाथ यांच्या पर्यंत..केंद्रीय मंत्र्याने केले कौतुक

मार्च २०२५ पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणीसाठी मविआ सरकारने २७० कोटी तात्काळ मंजुर करुन कामाचा विकास आराखडाही तयार केला होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकारमधील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी हे काम रद्द केले नसल्याचे सांगूनही या कामासाठी निधीची तरतूदच केली नाही. त्यामुळे तमाम हिंदूंचे दैवताचे स्मारकाबद्दल असे वागणा-या सरकारने विधानसभेतही माझ्या औचित्याच्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केल्यास आपण गप्प बसणार नसून थेटपणे आंदोलनाचे पाऊल उचलले जाईल, असा थेट इशारा शिरुर-हवेलीचे आमदार पवार यांनी सणसवाडी (ता.शिरूर) येथे दिला.

MLA Ashok Pawar Latest News
'सत्तेविना मती गेली,जो मिळेल त्याच्याशी युती केली', मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला..

महाविकास आघाडी सरकारकडून वढु बुद्रुक व तुळापूर (ता.हवेली) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेत त्यासाठी तात्काळ २६९ कोटी २४ लाख एवढ्या निधीची तरतूद केली होती. मात्र सरकार बदलल्यावर शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआ सरकारची अनेक मंजुर कामे रद्द केली त्यात वढु बुद्रुकचेही काम होते. मात्र या कामाबद्दल आक्षेप नोंदविले गेल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी स्वत: जाहीर केले की, हे काम रद्द केलेले नाही.

मात्र नुकत्याचच्या अधिवेशन काळात इतर मतदार आमदारांच्या कामाला निधी देताना वढु बुद्रुकच्या कामाच्या मंजुरीबाबत मात्र कार्यवाहीच होत नसल्याचे वढु बुद्रुक ग्रामस्थ व संपूर्ण मतदार संघातील जनतेच्या निदर्शनास येताच पावसाळी अधिवेशनाचे शेवटचे दिवशी आमदार अशोक पवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत सदर कामाच्या विकास आराखड्यासाठी तात्काळ निधी प्रावधानाची विनंती केली होती. मात्र या प्रकरणी सरकारकडून चालढकल, दूर्लक्ष तसेच टाळाटाळ होत असल्याच्या वढु बुद्रुक ग्रामस्थांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

MLA Ashok Pawar Latest News
I am Sorry... म्हणत अखेरच्या दिवशी एन.व्ही. रमना यांनी मागितली माफी

पवार यांनी सांगितले की, तमाम महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाबाबत सरकारकडून टाळाटाळ होत असेल तर आपण गप्प बसणार नाही. याबाबत आपण विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी वरील प्रकरणाचे गांभीर्य निदर्शनास आणून तर दिले आहे. शिवाय मविआ सरकारच्या चांगल्या निर्णयबाबत असे होत असेल तर थेट सरकार म्हणूनही आपण तमाम विरोधी पक्षांच्या मविआ आघाडीच्या वतीनेही हे काम पूर्ण करुन घेण्यासाठी सरकाकडे पाठपूराव्याने प्रयत्नशील राहणार आहे.

अर्थात सरकारच्या छत्रपती संभाजी महाराज स्मारक विरोधी धोरणाविरोधात आपण संपूर्ण मतदार संघाला घेवून आंदोलन करु,असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान वढु बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, अनिल शिवले, माजी उपसरपंच रमाकांत शिवले, ग्रामपंचायत सदस्य माऊलीआप्पा भंडारे, कृष्णा आरगडे आदींच्या शिष्ठमंडळासोबत बोलताना सणसवाडी येथे ही माहिती पवार यांनी दिली.

७५ कोटींच्या नदीपुलाचाही प्रस्ताव सादर...!

वढु बुद्रुक समाधीस्थळावर भाविकांना व शंभूभक्तांना ये-जा करण्यासाठी वाघोली-भावडी-तुळापूर-आपटी या ५ किलोमिटरच्या रस्त्यासाठी ३५ कोटी आणि वाघोली-भावडी-तुळापूर-आपटी रस्त्याचे दरम्यान भिमानदीवरील पुलासाठी ४० कोटी असे एकुण ७५ कोटींची स्वतंत्र मागणीआपण केलेली असून याबाबतीत तात्काळ निधीमंजुरी मिळण्यासाठीही युध्द पातळीवर प्रयत्न करीत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com