आमदार माधुरी मिसाळ कार्यकर्त्याची बाजू घेणार की नागरिकांना साथ देणार?

PMC पालिकेच्या उद्यानाला नगरसेवकांच्या वडिलांचे नाव देण्याला पुणेकरांचा विरोध
MLA Madhuri misal
MLA Madhuri misalSarkarnama

पुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाला स्वतःच्या वडिलांचे नाव दिल्यामुळे त्यावरून वाद निर्माण झाला आहे.या प्रकरणात लक्ष घालून चर्चा करणार असल्याचे आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी स्पष्ट केले. मिसाळ यांच्या मतदारसंघातील हा प्रश्‍न असल्याने त्यांना विचारलेल्या प्रश्‍नावर आमदार मिसाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

MLA Madhuri misal
अमित शहांनी दोन मुख्यमंत्र्यांना समोर बसवलं अन् पन्नास वर्षांपासूनचा वाद मिटला

माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाला त्यांच्या वडीलांचे नाव दिल्याने स्थानिक नागरिकांनी याविरोधात आंदोलन केले आहे. या उद्यानाला पुणे महापालिका उद्यान असेच नाव द्यावे अशी मागणी केली आहे. यासंदर्भात आमदार मिसाळ म्हणाल्या,‘‘वडिलांच्या नावाचे स्मरण असावे यासाठी उद्यानाला नाव दिले असावे, पण नागरिकांनी यास विरोध केला असल्याने त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी भेट घेणार आहे. तसेच भिमाले यांच्याशीही चर्चा करणार आहे.

MLA Madhuri misal
`जरंडेश्वर`बाबत न्यायालयाचा मोठा निर्णय : कारखाना शेतकऱ्यांकडे देण्याची सोमय्यांची मागणी

विधीमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केलेल्या मुद्द्यांची माहिती देण्यासाठी आमदार मिसाळ पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या म्हणाल्या, ‘‘ सिंहगड रस्त्‍याच्या उड्डाणपुलासाठी यापूर्वीही बैठका झाल्यानंतर पुलाच्या आराखड्यात बदल झाले. मेट्रोचाही विचार करण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे काम करताना या भागात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग लवकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांचे या पुलाच्या आराखड्याबाबत आक्षेप आहेत, असे विचारले असता मिसाळ म्हणाल्या, ‘‘ धायरीच्या बाजूने येणारा उड्डाणपूल विठ्ठलवाडीतील पेट्रोलपंपाजवळ उतरत आहे. त्याऐवजी राजाराम पुलाजवळ उतरला पाहिजे अशी भूमिका आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा केली जाईल. शहरातील बहुतांश उड्डाणपूल चुकलेले आहेत. हा पूल चुकू नये, त्यासाठी आत्ताच बदल होणे आवश्‍यक आहे.’’

विधीमंडळाच्या अधिवेशनात पानशेत पूरग्रस्तांच्या १०३ सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचा विषय मांडला. त्याचप्रमाणे वन विभागाच्या जमिनीसाठी मिळणारा निधी नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करावा, महापालिकेच्या शहरी गरीब योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानेही योजना सुरू करावी, मुख्यमंत्री सहायता निधी पूर्ववत करावा, पर्वतीत कामगार विभागाच्या जागेवर ससूनच्या धर्तीवर रुग्णालय उभे करावे असे मुद्दे उपस्थित केले. तसेच समाविष्ट २३ गावांच्या झोनची निश्चिती करावी, तेथे सुविधा पुरविण्याची मागणी केली. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची नियमावली करावी, पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्‍न सोडवावा यासह इतर विषयांवर लक्षवेधी उपस्थित केली होती, असे मिसाळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com