`मी खंडोबाची शपथ घेऊन सांगतो की फक्त फडणविसांनी...`

आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांचे चिखली येथील भाषण गाजले..
`मी खंडोबाची शपथ घेऊन सांगतो की 
फक्त फडणविसांनी...`

पिंपरी : बैलगाडा शर्यत (Bullock cart race) पुन्हा सुरु करण्यात भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) व बैलगाडा संघटनेचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे ही शर्यत पुन्हा बंद होऊ नये, यासाठी प्रयत्नाची शर्थ करू, असा शब्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (ता.३१) पिपंरी-चिंचवडमध्ये दिला.

आमदार लांडगे यांनी आपल्या मतदारसंघात चिखली येथे आयोजित केलेल्या देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीला शेवटच्या म्हणजे पाचव्या दिवशी फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी बैलगाडा घाटात ते बोलत होते.

फडणवीस यांच्या अगोदर बोलताना लांडगे यांनी फक्त आणि फक्त फडणवीस यांच्यामुळे बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु झाल्याचे सांगितले होते. तो धागा पकडून फडणवीसांनी ही शर्यत सुरु होण्यास लांडगे व बैलगाडा संघटनांचा सिंहाचा वाटा असल्याची पावती दिली.

`मी खंडोबाची शपथ घेऊन सांगतो की 
फक्त फडणविसांनी...`
आमदार संजय शिंदे कोणाचे ऐकणार? अजितदादांचे की फडणविसांचे!

या शर्यतीसाठी लांडगे यांनी मला हा खास ड्रेस (कुर्ता, पायजमा)शिवून दिल्याचे सांगत त्यांनी पाहुण्यांना झूल घालून आणले, असे फडणवीस म्हणताच हास्याची लकेर उमटली. हा ड्रेस (झूल) व त्याबरोबर या शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी नांगरही घेऊन आल्याचे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला .त्यासाठी त्यांनी मुळशी पॅटर्न सिनेमातील बैलजोडीसह नांगर घेऊन आल्याचा डायलॉग ऐकवला.

आमच्या मनातील कायमचे मुख्यमंत्री असा फडणवीसांचा उल्लेख करीत बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होण्याचे एकमेव कारण भाऊ (फडणवीस) असल्याचे लांडगे यांनी सांगितले.मात्र,त्याचे श्रेय त्यांना मिळू नये म्हणून मराठेला आपल्यातीलच काहींनी बैलगाडा शर्यतीला आव्हान देण्यासाठी कोर्टात पाठवल्याचा दावा त्यांनी केला. फडणवीस सरकारअगोदर कुठल्याही सरकारने ही शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी एक रुपयाही खर्च केला नसल्याचे त्यांनी खंडोबाची शपथ घेत सांगितले.

`मी खंडोबाची शपथ घेऊन सांगतो की 
फक्त फडणविसांनी...`
विश्वबंधू राय यांचा लेटरबॉम्ब; राज्यसभा उमेदवारीवरुन कॉंग्रेसमध्ये धुसफुस कायम

त्यासाठी त्यांनी एका दिवसाची वकिलाची वीस लाखाची फी सरकारमधून भरण्याची तजवीज केली, असे ते म्हणाले. दुसरीकडे `पेटा` ही संघटना पाच पाच वकील या सुनावणीसाठी उभे करीत त्यांच्या एका दिवसाच्या फीवर सव्वा कोटी रुपये खर्च करीत होते,याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नारायणपूरचे अण्णामहाराज, राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके,मावळचे माजी आमदार व माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे आ. प्रसाद लाड, समाधान आवताडे (पंढरपूर), दौंडचे आमदार राहूल कूल, पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, पुणे जिल्ह्यातील भाजप नेत्या आशा बुचके आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in