आमदार लक्ष्मण जगतापांचा व्हेटीलेटर काढला अन् कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला...

आमदार लक्ष्मण जगताप हे चंद्रकांतदादांच्या प्रत्येक वाक्याला मान हलवून, हाताने प्रतिसाद देत होते.

आमदार लक्ष्मण जगतापांचा व्हेटीलेटर काढला अन् कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला...
laxman jagtapSarkarnama

पिंपरी : चिंचवडचे भाजप (BJP) आमदार आणि पक्षाचे पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराचे माजी अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे भाऊ लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे बाणेर येथील खासगी रुग्णालयात आठवड्यापासून उपचार घेत आहेत. अमेरिकेतून मागविण्यात आलेले इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होऊ लागली आहे. आज (ता.२० एप्रिल) तर, ते प्रतिसादही देऊ लागल्याने गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या तणावातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. कारण त्यांनी शहरातील अनेक गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त भाऊंच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना, तर शहर भाजपने ग्रामदैवत मोरया गोसावी मंदिरात महाभिषेक केला होता.

laxman jagtap
अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार लक्ष्मण जगतापांच्या प्रकृतीत झाली सुधारणा...

जगतापांच्या प्रकृतीची दर दोन तासांनी चौकशी करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह सकाळी जगताप यांना भेटून त्यांची विचारपूस केली. यावेळी भाऊंचे बंधू शंकर जगताप हे ही हजर होते. चंद्रकांतदादांच्या प्रत्येक वाक्याला भाऊ मान हलवून, हाताने.. प्रतिसाद देत होते, असे खर्डेकर यांनी या भेटीनंतर 'सरकारनामा'ला सांगितले. यावेळी चंद्रकांतदादांनी भाऊंना मोबाईलव्दारे एका मंत्राचा जपही ऐकवला, अशी माहिती त्यांनी दिली.

laxman jagtap
मोशी कचरा डेपोतील आगीची धग पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना?

यावेळी मी भाऊंचा हात हातात घेतला आणि म्हणालो काय भाऊ कालचा वायदा होता माझ्या कार्यक्रमाला येण्याचा, देवेंद्र फडणवीस आले होते. तुम्हाला Miss केले. पण, आता लवकर बरे व्हा, असे म्हणताच भाऊंनी मस्त स्मित केले. त्यातून दुआ से बढकर कोई दवा नाही याची आज प्रचिती आली, असे खर्डेकर म्हणाले. भाऊंचा व्हेंटीलेटर आता काढला असून ते डोळे उघडून प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांना झोप लागत आहे, असे त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.