अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार लक्ष्मण जगतापांच्या प्रकृतीत झाली सुधारणा...

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होऊ लागली आहे.
laxman jagtap
laxman jagtapSarkarnama

पिंपरी : चिंचवडचे भाजप (BJP) आमदार आणि पक्षाचे पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराचे माजी अध्यक्ष तथा कार्यकर्त्यांचे भाऊ लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे बाणेर येथील खासगी रुग्णालयात आठवड्याभरापासून दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभावे याकरिता शहर भाजपने अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून शहराचे ग्रामदैवत महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिरात मंगळवारी (ता.१९ एप्रिल) महाभिषेक केला. दरम्यान, खास अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगतापांच्या प्रकृतीत आता सुधारणा होऊ लागली आहे.

laxman jagtap
आमदार लक्ष्मण जगताप यांचा उपचाराला प्रतिसाद: बंधू शंकर जगतापांंची माहिती

दुसरीकडे जगताप रुग्णालयात असल्याने शहर भाजप काहीशी सैरभैर झाली आहे. पदाधिकारी व कार्यकर्ते चिंतेत आहेत. ते सर्व आपल्या नेत्याला बरे वाटावे म्हणून प्रार्थना करीत आहेत. अंगारकी चतुर्थीनिमित्त त्यांच्या मतदारसंघातील बहूतांश गणेश मंदिरात त्यांच्या दिर्घायूष्यासाठी त्यांचे समर्थक माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी आज प्रार्थना केल्या. शहर भाजप त्याला अपवाद नव्हती. त्यांनी चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरात सामूहिक महाभिषेक केला. चिंचवडचे ग्रामजोशी कौस्तुभ रबडे गुरुजी यांनी त्याचे पौरोहित्य केले.

laxman jagtap
राज्यपालांच्या शिफारसपत्रावर भोंडवे म्हणाले, ‘आमचे एकच बॉस...अजितदादा!’

यावेळी पालिकेतील माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, महिला शहराध्यक्षा उज्वला गावडे, शहर उपाध्यक्ष शेखर आण्णा चिंचवडे, कामगार नेते हरिभाऊ चिंचवडे, दिपक आण्णा गावडे आदीनी भाऊंसाठी प्रार्थना करीत महाभिषेकात सहभाग घेतला. दुसरीकडे भाजपचे राज्यभरातील नेत्यांचा रुग्णालयाकडे ओघ सुरुच आहे. केंद्र सरकारमधील महाराष्ट्रातील मंत्रीही त्याच्या प्रकृतीची विचारपूस करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com