आमदार लक्ष्मण जगताप यांना राज्यसभेच्या मतदानाला आणायचे कसे? भाजप नेत्यांची तासभर खलबत

BJP | Rajya sabha Election | Laxman Jagtap : एक-एक मत महत्वाचे असतानाच जगताप यांना मतदानाला आणायचे कसे हा भाजपसमोर मोठा पेच
Laxman Jagtap News in Marathi
Laxman Jagtap News in MarathiSarkarnama

पिंपरी : भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांना राज्यसभेसाठी मतदानाला विधानभवनात आणायचे कसे यावर भाजपचे (BJP) महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि भाजपच्या सर्व जेष्ठ नेत्यांमध्ये सुमारे तासभर खलबत झाली. अशातच राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांच्या खांद्यावर सर्व जबाबदारी आली आहे. फडणवीस यापुढील बैठकांना व्हिडिओ कॉल किंवा फोनवरुन संपर्कात राहणार आहेत.

आमदार जगताप यांना काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासले आहे. २ दिवसांपूर्वीच तब्बल ५० दिवसांच्या उपचारानंतर त्यांना पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी ते अमेरिकेतही उपचार घेऊन आले होते. त्यानंतरही त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना १२ एप्रिल रोजी ज्यूपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना व्हेंटीलेटर देखील लावण्यात आला होता. या दरम्यान, अमेरिकेहून मागविलेल्या सुमारे एक लाख रुपयाच्या इंजेक्शनमुळे त्यांच्या प्रकृती कमालीची सुधारणा झाली आहे.

भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवले आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार पियुष गोयल (Piyush Goyal) आणि अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्या रुपाने भाजपच्या दोन जागा आरामात निवडून येणार आहेत. मात्र धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यारुपाने भाजपने तिसरा आणि अतिरीक्त उमेदवार दिला आहे.

महाडिक यांना निवडूण आणण्यासाठी भाजपने रणनिती तयार केली असून त्यानुसार अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडीसह असलेल्या छोट्या पक्षांच्या आमदारांशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. काल धनंजय महाडिक यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यामुळेच भाजपसाठी एक-एक मत महत्वाचे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आमदार जगताप यांना मतदानासाठी आणायचे कसे यावर आज भाजप नेत्यांमध्ये खलबत झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in