भाजप नगरसेविकेने का दिला राजीनामा आमदार जगतांपाकडून सांगण्यात आले कारण..

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सत्ताधारी भाजपच्या (BJP) नगरसेविका चंदा राजू लोखंडे यांनी सोमवारी राजीनामा दिला आहे.
Laxman Jagtap
Laxman JagtapSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सत्ताधारी भाजपच्या (BJP) नगरसेविका चंदा राजू लोखंडे यांनी सोमवारी (ता.२१ फेब्रुवारी) पदाचा राजीनामा दिला. गेल्या पाच दिवसात भाजपच्या नगसेवकाने दिलेला हा दुसरा राजीनामा आहे. भाजप नेते व प्रभागातील सहकारी नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिल्याचे लोखंडे यांनी सांगितले आहे. मात्र, सत्यस्थिती त्यापेक्षा वेगळी असल्याचे भाजपने यासंदर्भात केलेल्या दाव्यातून समोर येत आहे. पुन्हा तिकिट मिळणार नाही, तुमचा पर्याय शोधा, असे लोखंडेंना स्पष्टपणे सांगितल्याने त्यांनी पक्ष सोडला आहे, असे भाजपमधून सांगण्यात आले.

Laxman Jagtap
तीनचा प्रभाग न्यायालयीन वादात अडकणार

पिंपरी-चिंचवड भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी गेल्या बुधवारी (ता.१६ फेब्रुवारी) राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा प्रभाग मोडत असलेल्या भोसरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांची त्यावर लगेचच प्रतिक्रिया आली होती. त्यामुळे लोखंडेच्या राजीनाम्यावर त्यांचा प्रभाग येत असलेल्या चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. तसे वृत्त 'सरकारनामा'ने थोड्या वेळापूर्वी दिले होते. ते लगेच खरे ठरले. जगताप यांच्या कार्यालयातून 'सरकारना'मा प्रतिनिधीला फोन आला. आमदार जगतापांच्या पीएनी सांगितले की, २०१७ ला लोखंडेंच्या प्रभागात (क्र.२९,पिंपळे गुरव) चारपैकी एकेक जागा ही एससी, एसटी महिला, ओबीसी पुरुष आणि ओपन महिला राखीव होती. लोखंडे या ओबीसी असूनही त्यांना ओपन महिला जागेत तिकिट देऊन त्यांना निवडून आणले. २०१७ ला चारचा प्रभाग होता. आता २०२२ ला तो तीन सदस्यीय झाला आहे. त्यामुळे आता प्र. २९ मध्ये एकेक जागा ही एसटी, एससी आणि ओपन अशी झाली आहे. तेथे ओपनममधून पुन्हा लोखंडेंना मतदार निवडून देण्याची शक्यता नव्हती. म्हणून त्यांना तीनचा प्रभाग होताच लगेचच तिकिट मिळणार नाही, असे सांगितले. तसेच पर्याय शोधा असेही त्यांना सांगण्यात आले होते.

ओबीसी महिलेला ओपनमधून निवडून आणले, आणखी काय करायला हवे, अशी विचारणा जगतापांच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे बोराटे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू, असे आमदार लांडगे यांनी सांगत चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लोखंडेच्या राजीनाम्यानंतर आम्ही मनधरणी करायला जाणार नाही, असे जगताप यांच्या कार्यालयातून स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यामुळे बोराटेंच्या बाबतीत मनधरणीचा प्रयत्न झाला, तसा तो लोखंडेच्या बाबतीत होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

Laxman Jagtap
आमदार लांडगें पाठोपाठ जगतापांनाही झटका; भाजप नगरसेविका राष्ट्रवादीत

दरम्यान, भाजपला हा धक्का देण्यात आ. जगतापांचे कट्टर राजकीय विरोधक आणि राष्ट्रवादीचे स्थानिक माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचे डावपेच असल्याचे समजते. आमदार जगतापांचा एकेक कार्यकर्ता फोडून तो राष्ट्रवादीमध्ये आणण्यात ते आपला खारीचा वाटा उचलीत आहेत. यापूर्वी त्यांनी आ. जगतापांचे निष्ठावंत व शहरातील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, आज राजीनामा दिलेल्या नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती व आ. जगतापांचे विश्वासू माजी नगरसेवक राजू लोखंडे, मनसेचे शहर पातळीवरील नेते प्रदीप गायकवाड, आदिवासी समाजाचे नेते प्रा. विष्णू शेळके, बंजारा समाजाचे नेते संदीप राठोड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणलेला आहे.

दुसरीकडे निवडून आल्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविताना अनंत अडचणी आणल्या. प्रथमपासून आपणास न विचारता भाजप नेते निर्णय घेत होते. प्रभागातील अन्य नगरसेवक व भाजप नेत्यांकडून जाणूनबुजून त्रास देण्यात आला. प्रभागातील विकासकामे करताना हेतुपुरस्सर त्रास दिल्याने विकासकामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत. विविध अडचणी आमच्यासमोर उभ्या केल्या. त्रास असाह्य झाला होता. त्याला कंटाळून राजीनामा दिला, असे चंदा लोखंडे यांनी आय़ुक्तांना राजीनामा दिल्यानंतर सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com