आमदार जगतापांनी स्वीकारली संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची जबाबदारी

कर्मचाऱ्यांना एसटी (ST) स्थानकाच्या 200 मीटर परिसराबाहेर आंदोलन करण्यास सांगितले आहे.
Laxman Jagtap
Laxman JagtapSarkarnama

पिंपरी : राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) म्हणजे एसटीचे (ST) शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेले महिनाभर एसटी कर्मचारी संपावर आहेत. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराच्या वल्लभनगर आगारातील एसटी कर्मचारीही आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाला चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनी रविवारी (दि.5 डिसेंबर) दुसऱ्यांदा भेट देत आंदोलनाची स्थिती आणि येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. याबरोबरच आंदोलन सुरू असेपर्यंत सर्व आंदोलक कर्मचाऱ्यांना जेवण पुरवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तसेच, अन्य कोणतीही अडचण आल्यास मदतीचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Laxman Jagtap
बारामतीत निघाला एसटी संपावर तोडगा

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एका महिन्यांहून अधिक काळापासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर एसटी आगारातील 190 पेक्षा जास्त कर्मचारी या अंदोलनात सहभागी झालेले आहेत. एसटी आगाराबाहेर छोटा मंडप टाकून ते आंदोलन करीत होते. मात्र, आता प्रशासनाने कर्मचाऱ्यांना हा मंडप हटवण्यास भाग पाडून एसटी स्थानकाच्या 200 मीटर परिसराबाहेर आंदोलन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांनी डेपोपासून 200 मीटर परिसराबाहेर पुन्हा जोमाने आंदोलन सुरू ठेवले आहे. हे समजताच जगताप यांनी रविवारी नव्या जागेतील आंदोलनस्थळाला भेट दिली.

यापूर्वीही त्यांनी या आंदोलनाला भेट दिली आहे. यावेळी नगरसेविका उषा मुंढे, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी संतोष कलाटे आदी उपस्थित होते.

Laxman Jagtap
`तो` दक्षिण अफ्रिका, दुबई, दिल्लीहून आला अन् `ओमायक्रॉन` घेऊन आला!

आंदोलनाच्या सद्यस्थितीबाबत जगतापांनी माहिती घेतली. विलीनीकरण नाही, तर आंदोलन मागे नाही ही भूमिका कायम असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. आपल्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत आपण असल्याचेही ते म्हणाले. जगताप यांनी आंदोलन करताना एसटी कर्मचाऱ्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, याची माहिती घेतली. सर्व अडचणींवर मात करून एसटी कर्मचारी आंदोलन यशस्वी करतील, असा विश्वास व्यक्त करत धीर दिला. तसेच, आंदोलनात सहभागी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन सुरू असेपर्यंत जेवण पुरवण्याची हमी देत, कर्मचाऱ्यांना अन्य कोणत्याही अडचणी आल्यास मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com