Bhaskar Jadhav : ठाकरे गटाच्या आमदाराला दिलासा ; अटकपूर्व जामीन मंजूर

Bhaskar Jadhav : सिंधुदुर्गातील कुडाळ येथे जाहीर सभेत राणे यांच्यावर टीका केली होती.
Bhaskar Jadhav  latest news
Bhaskar Jadhav latest news sarkarnama

Bhaskar Jadhav : भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात पुण्यात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी जाधव यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कुडाळ येथे नारायण राणे यांच्याबाबत जाधव यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नारायण राणे, त्यांचे चिरंजीव आमदार निलेश राणे, माजी खासदार नितेश राणे यांच्याविषयी भास्कर जाधव यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. सिंधुदुर्गातील कुडाळ येथे त्यांनी जाहीर सभेत राणे यांच्यावर टीका केली होती.

या आधी भास्कर जाधव यांना या प्रकरणात तात्पुरता जामीन देण्यात आला होता. मात्र, भास्कर जाधवांनी कायम स्वरुपी जामीन मिळावा यासाठी वकीलामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. अखेर दोन्ही बाजू ऐकून पुणे सत्र न्यायालयाने भास्कर जाधव यांचा जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी जाधव यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

Bhaskar Jadhav  latest news
Thackeray Vs Shinde : श्रेयवादावरुन ठाकरे-शिंदे गटामध्ये जुंपली !

याबाबत ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर तक्रारदाराने डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात जाधव यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. जाधव यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी शिवाजीनगर न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता.

जाधव तपासात सहकार्य करतील. जाधव यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यातील कलम १५३ (अ) लागू होत नाही. न्यायालयाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन केले जाईल. जाधव यांचा अंतरिम जामीन कायम करण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. ठोंबरे यांनी न्यायालयात केला.

सरकारी वकील ॲड. प्रदीप गेहलोत यांनी जामिनास विरोध केला. जाधव यांनी भाषण केल्याचे कबूल केले. त्यांनी जाणूनबुजून भाषणाची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित केली होती. जाधव यांच्या आवाजाच्या नमुन्यांची तपासणी करायची आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com