PCMC News : विधानसभेत आमदार अश्विनी जगतापांनी उठवला आवाज; चिंचवडबरोबरच मावळसाठीही केली महत्त्वाची मागणी

Pimpri-Chinchwad News : अश्विनी जगतापांचा आमदारकीचा शपथविधी ९ मार्चला झाला.
Ashwini Jagtap News
Ashwini Jagtap News Sarkarnama

Ashwini Jagtap News : चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी आमदारकीची शपथ घेऊन दोन आठवडे होत नाही, तोच विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात अनुदानावरील चर्चेत आज सहभाग घेतला. मतदारसंघाच्या जोडीने लगतच्या मावळमधील विषयांवरही त्या बोलल्या, हे विशेष.

२६ फेब्रुवारीला मतदान झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीचा (Pimpri-Chinchwad) निकाल २ मार्चला लागला. त्यात विजयी झालेल्या आमदार अश्विनी जगतापांचा आमदारकीचा शपथविधी ९ मार्चला झाला. मात्र, त्यापूर्वीच त्या कामाला लागल्या होत्या. ६ मार्चला त्यांनी सांगवी येथील पुणे जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन उपचाराविना रुग्णांना घरी पाठवणाऱ्या तेथील डॉक्टरांना फैलावर घेतले होते तर, आज त्यांनी आमदारकीला तीन आठवडे व्हायच्या आतच थेट विधानसभेतील चर्चेतच भाग घेऊन आपल्या कामाची चुणूक दाखवली.

Ashwini Jagtap News
Bhai Jagtap News : लव्ह जिहाद, धर्मांतराचा कायदा करतांना त्याला जाती, धर्माचा वास नको..

दुसरीकडे उद्योगनगरीतील तीनपैकी एक आमदार या अधिवेशनात अद्याप बोललेले नाहीत. नागपूरच्या गत हिवाळी अधिवेशनातही त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले होते. आमदार अश्विनी यांचे पती आणि चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे सुद्धा मतदारसंघातील नव्हे, तर त्याबाहेरीलही प्रश्न विधानसभेत मांडत होते. त्यांचाच कित्ता त्यांच्या पत्नीही पुढे गिरवीत आहेत. त्यांनी अर्थसंकल्पीय अनुदानाच्या पर्यटन आणि सांस्कृत्रिक विभागाच्या चर्चेत सहभाग घेतला.

त्याची सुरवात त्यांनी स्वर्गीय लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या स्मृतीस अभिवादन करून केली. चिंचवडगावातील चाफेकरवाड्याच्या तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेशाची आणि तेथील मोरया गोसावी मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्टला 'क' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली.

Ashwini Jagtap News
Khadse-Mitkari News : ‘ते’ पाकिस्तानातून आलेले असले तरी हिंदू आहेत, त्यांच्या जमिनी वर्ग एक मध्ये टाका !

त्याशिवाय लगतच्या मावळातील पर्यटनासाठी तेथील लोणावळा-खंडाळा कार्ला याचा सर्वांगीण पर्यटन विकास आराखडा तयार करण्याची आणि विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळातीलच लोहगड विसापूर किल्याची दुरुस्ती आणि संवर्धन करणे, कार्ला येथील एकविरा माता आणि शिरगाव साई मंदिर येथे पर्यटक आणि भाविकांसाठी पायाभूत सोयी सुविधा उभारण्याकरिता निधीची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com