घोडगंगा कारखान्याचे चेअरमन ठरले : उपाध्यक्षपदासाठी ही नावे आघाडीवर!

कारखान्याच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड येत्या गुरूवारी (ता. १७) होणार आहे.
Ghodganga Sugar Factory
Ghodganga Sugar FactorySarkarnama

शिरूर (जि. पुणे) : शिरूर (Shirur) तालुक्यातील घोडगंगा (Ghodganga) सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दणदणीतपणे पाचव्यांदा ऐतिहासिक विजय मिळविला. कारखान्याच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड येत्या गुरूवारी (ता. १७) होणार आहे. अध्यक्षपदावर आमदार ॲड. अशोक पवार यांची निवड निश्चित समजली जात आहे. मात्र, उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे. (MLA Ashok Pawar confirmed as chairman of Ghodganga Sugar Factory)

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूकीत, आमदार ॲड. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने स्पष्ट बहुमत मिळविले. २१ पैकी केवळ एक जागा विरोधी घोडगंगा किसान क्रांती पॅनेलला मिळाली. दादा पाटील फराटे हे एकमेव संचालक त्या पॅनेलमधून निवडून आले. आता या निवडणूकीनंतर, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी घोडगंगा कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रविण शिंदे यांनी येत्या गुरूवारी (ता. १७) संचालक मंडळाची विशेष सभा बोलावली आहे. पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक दिग्विजय आहेर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

Ghodganga Sugar Factory
अशोक पवारांवर विश्वास ठेवत तुम्ही एकजूट राखली अन्‌ जिंकलात...भले शाब्बास : ‘घोडगंगा’च्या संचालकांचे अजितदादांकडून अभिनंदन

घोडगंगाच्या अध्यक्षपदाचा कारभार सलग सहाव्यांदा आमदार ॲड. अशोक पवार यांच्याकडे सोपविला जाणार असल्याचे निश्चीत असून, त्याबाबतची केवळ औपचारिकता बाकी आहे. सन १९९७ पासून आमदार पवार यांच्याकडेच कारखान्याच्या अध्यक्षपदाची धूरा असून, या कालावधीत त्यांनी कारखान्याच्या कामकाजात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्याच कारकिर्दीत कारखान्याला देश व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले असून, कारखान्याबाबतचे महत्वाचे निर्णयही झाले आहेत.

Ghodganga Sugar Factory
मोठी बातमी : महापालिका-नगरपालिकांची डिसेंबरमध्ये रणधुमाळी; दुसऱ्या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती

या पार्श्वभूमीवर आता उपाध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार, याबाबत उस उत्पादक सभासदांबरोबरच सामान्य शेतकरी व नागरीकांतही उत्सूकता निर्माण झाली असून, उपाध्यक्षपदी ठराविक कालावधीसाठी एकापेक्षा अधिक संचालकांना संधी देण्याचा गतवेळचा फॉर्म्यूला यंदाही राबविला जाणार असल्याचे निश्चीत आहे. प्रथम उपाध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार, त्यासाठी कुठले निकष लावले जाणार, जुन्या जाणत्यांना मान दिला जाणार की नव्याला संधी मिळणार याबाबत विविध तर्क - वितर्क लढविले जात आहेत.

Ghodganga Sugar Factory
शहाजीबापू पाटलांना घेरण्याची उद्धव ठाकरेंची रणनीती : कट्टर विरोधकास पाठबळ!

विरोधी पॅनेलचे दादा पाटील फराटे ज्या गटातून निवडून आले, त्याच गटातून विजय खेचून आणताना विरोधकांना जागेवरच रोखणारे संभाजीराव फराटे यांचे नाव त्यादृष्टीने आघाडीवर आहे. त्यांच्यासह ज्येष्ठ म्हणून आबासाहेब पाचुंदकर, वाल्मिकराव कुरंदळे यांच्या नावांचीही चर्चा आहे. अध्यक्षपदी आमदार पवार यांच्यासारखे जुने, जाणते, अभ्यासू नेतृत्व आरूढ होणार असल्याने उपाध्यक्षपदी कदाचित नवख्या संचालकालाही संधी दिली जाऊ शकते. त्यादृष्टीने विक्रमी मतांनी निवडून आलेले सचिन मचाले, आमदार पवार यांची बाजू कायमच तडाखेबंद पद्धतीने लावून धरणारे नरेंद्र माने किंवा विभागीय समतोल साधताना सुहास थोरात यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com