
पुणे : आम आदमी पार्टीच्या (Aam aadmi party) महाराष्ट्र युवा आघाडीचे अधिवेशन येत्या रविवारी (ता. ३१) पुण्यात होणार आहे. अधिवेशनाला आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते, राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay sinh) उपस्थित राहणार आहेत.पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून या अधिवेशनाकडे पाहिले जात आहे.
पंजाबमधील विजयानंतर आपने महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात अस्तित्व दाखवायला सुरवात केली आहे. हरयाना, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, गुजरातसह महाराष्ट्राचा यात प्रामुख्याने समावेश आहे. राज्यात पुण्यात पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात आल्याने अधिवेशन पुण्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात सुशिक्षित युवक वर्गाकडून पक्षाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे पुण्यात अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पक्षाच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अधिवेशनाची माहिती दिली.अधिवेशन बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात होणार आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षाचे रज्यातील नेते एकत्र येणार आहेत. शनिवारी (ता. ३०) राज्य समितीची बैठक पुण्यात होणार आहे. पक्षाचे प्रदेश प्रभारी दीपक सिंगला, निवडणूक प्रभारी व गोव्याचे माजी मंत्री महादेव नाईक, प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे तसेच पक्षाचे सर्व नेते अधिवेशनात सहभागी होणार आहेत. पुणे महापालिका निवडणूक तसेच राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
पुणे महापालिका निवडणुकीवर लक्ष ठेऊन गेल्या वर्षभरापासून आपच्यावतीने पुण्यात काम सुरू करण्यात आले आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडणारी विविध आंदोलन गेल्या वर्षभरात करण्यात आली आहेत. राज्यात सर्वात सक्रिय कार्यकर्ते पुण्यात आहेत. पुणेकरांकडून मिळणारा प्रतिसाददेखील उत्साह वाढविणारा असल्याचे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने पुण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.