लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्रीपुत्र अशिष मिश्राला अखेर अटक
Ashish MishraSarkarnama

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्रीपुत्र अशिष मिश्राला अखेर अटक

सलग १२ तासांच्या चौकशीनंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोटारी घुसवून हिंसाचार घडवल्याप्रकरणी संशयित म्हणून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा अशिष मिश्रा यास सलग १२ तासांच्या चौकशीनंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

उत्तरप्रदेशचे डीआयजी उपेंद्र अतुल अग्रवाल यांनी आशिष मिश्राच्या अटकेची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू घटनेबद्दल योग्य माहिती देत ​​नव्हता.तपासातही सहकार्य करत नव्हता. खून, अपघाती मृत्यू, गुन्हेगारी कट, हलगर्जीपणे ड्रायव्हिंग या कलमांखाली 12 तासांच्या चौकशीनंतर आशिषला अटक करण्यात आली.’’

Ashish Mishra
‘महाराष्ट्र बंद’च्या इशाऱ्यामुळे महाविद्यालये सुरू होण्याचा मुहुर्त आता मंगळवारी

घटनेच्या दिवशी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेत कुठे होता.याचा तपशील तो देऊ शकले नाही.आशिष मिश्रा तपासात सहकार्य करत नाही, प्रश्नांची योग्य उत्तरे देत नाही, आम्ही त्यांना अधिकृतरित्या अटक केली आहे.मेडिकल करून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, असे अग्रवाल यांनी सांगितले.

Ashish Mishra
पुणे जिल्ह्यात लसीकरणाचे टार्गेट : दसऱ्यापर्यंत शंभर टक्के लसीकरण

लखीमपूर हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेश सरकारने सर्व मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45-45 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती. याशिवाय मृतांच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीही देण्यात येईल.हिंसाचारप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आशीष शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकापुढे हजर झाला होता. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील नऊ अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने त्याची सुमारे १२ तास चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

Edited By Umesh Ghongade

Related Stories

No stories found.