राज्यमंत्री भरणे यांची जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत 'या' गटातून माघार...

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २ जानेवारी २०२२ रोजी होत आहे.
Dattatreya Bharane 

Dattatreya Bharane 

sarkarnama

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत (Pune District Bank Election) चांगलीच रंगत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatreya Bharane) यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील 'क' वर्गातून भरलेला उमेदवारी अर्ज भरणे यांनी माघारी घेतला.

<div class="paragraphs"><p>Dattatreya Bharane&nbsp;</p></div>
भाजप लढण्यापूर्वीच पराभूत ; पुणे जिल्हा बॅकेच्या संचालकपदी माऊली दाभाडे बिनविरोध

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २ जानेवारी २०२२ रोजी होत आहे. २२ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. राज्यमंत्री भरणे यांनी निवडणुकीसाठी 'ब' व 'क' अशा दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाने 'ब' गटातून भरणे यांना उमेदवारी दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Dattatreya Bharane&nbsp;</p></div>
आमदार प्रज्ञा सातव यांची राजकारणातील पहिली कसोटी!

तर राष्ट्रवादीने 'क' गटातून हवेली तालुक्यातील सुरेश मारुती घुले यांना उमेदवारी दिली असल्यामुळे भरणे यांनी आज 'क' गटातील आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाचे 'अ' गटातील सहा उमेदवार बिनविरोध झाले आहेत. या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, रेवणनाथ दारवटकर, ज्ञानोबा दाभाडे यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com