हर्षवर्धन पाटलांनी सांगलीत अजितदादांच्या कानात काय सांगितले..? राज्यमंत्री भरणेंनी केले उघड!

सध्या त्यांना काही काम शिल्लक राहिले नसल्याने तालुक्यात जातीयवादाचे विष पेरण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे.
Ajit Pawar-Harshvardhan Patil-Dattatray Bharane
Ajit Pawar-Harshvardhan Patil-Dattatray Bharane Sarkarnama

कळस (जि. पुणे) : सांगलीचे खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांच्या मुलाच्या लग्नात थेट उपमुख्यमंत्री अजितदादांच्या (Ajit Pawar) कानाला लागून तालुक्यात जातीयवाद चालल्याचे सांगणारे जनतेमध्येही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी माजी सहकार मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यावर केला. (Minister of State Dattatray Bharane criticizes former Minister Harshvardhan Patil)

इंदापूर तालुक्यातील पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गटातील सुमारे ९७ कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पळसदेव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यमंत्री भरणे म्हणाले की, उजनी धरणातून येणारे पुण्याचे सांडपाणी इंदापूर तालुक्यातील शेतीला उपलब्ध करुन देण्याच्या योजनेला खीळ घालण्यासाठी सोलापूरकरांमध्ये उद्रेक घडवून आणण्याचा प्रयत्न तालुक्याचे १९ वर्षे प्रतिनिधित्व केलेले आणि प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसण्याची संधी मिळालेल्या नेत्याने केले. सध्या त्यांना काही काम शिल्लक राहिले नसल्याने तालुक्यात जातीयवादाचे विष पेरण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे.

Ajit Pawar-Harshvardhan Patil-Dattatray Bharane
'शिवाजी पार्कमध्ये सभा होती, त्यावेळी राज ठाकरे छत्री घेऊन उभे होते काय?'

खडकवासला कालव्यात उजनीचे पाणी सोडण्याची योजना हाणून पाडण्याचे कामही विरोधकांनीच केले आहे. स्वतःचे राजकारण संपुष्ठात आल्याने विरोधकांनी सोलापूरकरांमध्ये गैरसमज निर्माण करुन मला तेथे झिरो करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मात्र, हा मामा अजून थांबलेला नाही. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जे काही करता येईल, ते करण्याची माझी तयारी आहे. तालुक्यातील विकासकामे पाहता व त्यासाठी आलेला निधी बघता निधी मंजूर करण्याचे काम कोणा येड्यागबाळ्याचे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Ajit Pawar-Harshvardhan Patil-Dattatray Bharane
‘बारामती ॲग्रो’ला आदिनाथ भाडेत्त्वावर देण्यास कोर्टात आव्हान; रोहित पवारांनी केली भूमिका स्पष्ट!

पळसदेव येथील बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणात कोणावरही अन्यान न करता नियमानुसार रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण होत असल्याने येथील व्यापारपेठ वाढीस त्याचा हातभार लागत आहे, त्यातून रोजगाराची संधी निर्माण होत आहे. मला मंत्रीपद मिळाले म्हणजे मी सत्तेचे ताम्रपट घेऊन आलेलो नाही, याची मला जाणीव आहे, त्यामुळेच मिळालेल्या संधीचा जनसामान्यांसाठी उपयोग व्हावा, यासाठी मिळेल त्या विभागातून निधी आणून विकासकामे केली जात आहेत, असे दत्तात्रेय भरणे यांनी स्पष्ट केले.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, माजी सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी अध्यक्ष महारुद्र पाटील, श्रीमंत ढोले, दीपक जाधव, बाळासाहेब काळे, मेघराज कुचेकर, हनुमंत बनसुडे, सरपंच इंद्रायणी सुजित मोरे, उपसरपंच सोनाली कुचेकर यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेघराज कुचेकर यांनी प्रास्ताविक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com