'मायक्रो फायनान्स' मधून लाखोंची फसवणूक करणाऱ्या 'बंटी-बबली' च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Micro Finance news update : लोकांची आगाऊ घेतलेली रक्कम परत न देता १२ लाख रुपयांपेक्षा फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल होता.
Micro Finance news update
Micro Finance news update sarkarnama

पुणे : "कुठले ही कर्ज १५ दिवसात उपलब्ध होईल," अशी खोटी बतावणी करुन लाखों रुपयांची फसवणूक करणाऱ्या 'बंटी-बबली'च्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. पुणे पोलिसांच्या पथकाने या दोघांना गुजरात मधून ताब्यात घेऊन अटक केली आहे. (Micro Finance news update)

या दोघांना न्यायालयात हजर होते. न्यायालयाने दोघांना २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तब्बल १०० ते १५० लोकांना फसवल्याचा आरोप या दोघांवर आहे. मायक्रो फायनान्सद्वारे कर्ज देतो, असे सांगून या दोघांनी अनेकांना फसविल्याची माहिती समोर येत आहे.

हेमराज भावसार आणि दिपाली पौनिकर अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही युट्यूबवरचे कलाकार आहेत. त्यांनी एवढी मोठी रक्कम पुढे कुठे वापरली तसेच यांची अजून कुठली टोळी आहे का याचा तपास सध्या पुणे पोलिस करीत आहेत.

Micro Finance news update
Nirmala Sitharaman : फोटो काढण्याची विनंती करणाऱ्या कार्यकर्त्याला सीतारमण यांनी त्यांच्या भाषेत झापलं

हेमराज भावसार आणि दिपाली पौनिकर यांनी मानधन मायक्रो फायनान्स नावाची खोटी संस्था सुरू केली होती. मुकुंदनगर येथे त्याचे कार्यालय काढले होते. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना कर्जाची हमी हे दोघे जण देत होते. कुठले ही कर्ज १५ दिवसात उपलब्ध होईल अशी खोटी बतावणी करून लोकांची आगाऊ घेतलेली रक्कम परत न देता १२ लाख रुपयांपेक्षा फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल होता. पोलिसांनी पथक तयार करून या दोघांना गुजरात मधून ताब्यात घेतले आणि त्यांना अटक केली.

दोन दिवसापूर्वी अशीच कारवाई पोलिसांनी केली होती. पुण्यातील विविध भागातील मजुरांना गोळा करून त्यांना कामाचे व पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या नावने विविध बँकेत चालू आणि बचत खाते उघडत लोन अ‍ॅपच्या माध्यमातून 13 लाख उकळणार्‍या दोघांच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

स्वप्नील हनुमंत नागटिळक (29, रा. विजापूर रोड, सोलापूर) आणि श्रीकृष्ण भिमन्ना गायकवाड (26, त्रिवेणीनगर, भेकराईनगर, हडपसर,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com