अजितदादांच्या टिकेला हवामान विभागाचे तिखट प्रत्युत्तर

हवामान विभागाच्या अंदाजावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली होती
Ajit Pawar Latest News
Ajit Pawar Latest News sarkarnama

मुंबई : हवामान खात्याचे (Meteorological Department) अंदाज सध्या चुकायला लागले आहेत. रेड अलर्ट देतात आणि पाऊसच पडत नाही. मात्र, शाळांना सुट्टी जाहीर होते. हवामान खात्यावर केंद्रसरकारने व राज्याने हवा तो खर्च करावा आणि सुधारणा करावी. हवामान खात्याने जाहीर केले की पाऊस पडतच नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले होते. त्यावर हवामान विभागाने उत्तर दिले आहे.

अजित पवार यांनी मुंबईत आज पत्रकार परिषदेत हवामान विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याविषयी पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होशाळीकर (K. S. Hoshalikar) यांनी प्रतिक्रिया दिली. हवामान विभाग जे काही अंदाज दर्शवत असते त्यातील अंदाज बऱ्यापैकी बरोबर असतात.

Ajit Pawar Latest News
गडकरी म्हणाले, राजकारण सोडावे वाटते; अजितदादा म्हणतात ते तर सत्ताधारी पक्षात...

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यासाठी तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. यासाठी पुणे तसेच पिंपरी चिंचवडमध्ये शाळांना सुट्टी दिली होती. खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्या काळात पाऊस पडलाच नाही, त्यामुळे अजित पवारांनी हवामान विभागावर टीका केली.

Ajit Pawar Latest News
अजितदादा संतापले : इतक्या खालच्या पातळीवरच राजकारण कधी पाहिलं नाही..`

यावर होशालीकर म्हणाले, हवामान विभागाने दिलेल्या सूचना नीट वाचल्या जात नाहीत. हवामान विभागाने फक्त घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. तो बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे. हवामान विभागाकडे बऱ्यापैकी यंत्रसामग्री असून केंद्र सरकार पुरेपूर निधी वेळोवेळी हवामान विभागाला देत असते. पुढच्या २५ वर्षाचे नियोजन हवामान विभागाकडे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in