केंद्रीय मंत्री शहांचे नाव घेताच राज्यातील काही लोकांना कापरे भरते - mentions Shah's name, some people in the state are shocked | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रीय मंत्री शहांचे नाव घेताच राज्यातील काही लोकांना कापरे भरते

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

संजय राऊत यांना सर्वच बाबतीत समजतेय अशी समजूत माध्यमांनी करून घेतली आहे,

पुणे : केंद्रात नव्या सहकार खात्याच्या चर्चेपेक्षा अमित शहा (Amit shaha) यांच्याकडे त्या खात्याच्या जबाबदारी आल्याची चर्चा राज्यभर होत आहे. शहा यांच्याकडे या खात्याची जबाबदारी आल्यानंतर राज्यातील काही लोकांना कापरे भरतेय त्याला आम्ही काय करणार, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (mentions Shah's name, some people in the state are shocked) 

सहकाराचे सर्वात मोठे जाळे महाराष्ट्रात आहे. मात्र, काहीजणांनी त्याचा दुरूपयोग केला असल्याने त्या लोकांना भीती वाटत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पुण्यात बोलताना ते म्हणाले, ‘‘ सहकाराचा उपयोग सामान्यांच्या हितासाठी व्हावा ही भूमिका आहे. मात्र, काही लोक त्याचा दुरूपयोग करीत आहेत. जे चुकीच्या पद्धतीने काम करताहेत त्यांना भीती वाटणारच. शहा यांचा सहकार क्षेत्रातील कामाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार खात्याला एक चांगली दिशा मिळेल.’’

संजय राऊत यांना सर्वच बाबतीत समजतेय अशी समजूत माध्यमांनी करून घेतली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. डॉ. भागवत कराड यांना केंद्रात मंत्री करण्यामागे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे महत्व कमी करऱ्याचा प्रयत्न असल्याचे संजय राऊत यांनी आजच्या अग्रेखात म्हटले आहे. या सभर्दात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बेलताना फडणवीस म्हणाले, ‘‘ डॉ. कराड हे मुंडे यांच्या परिवाराचा घटक आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते अत्यंत जवळचे होते. असे असताना कराड यांच्या मंत्रीमंडळातील नेमणुकीवरून चुकीची चर्चा करणे योग्य नाही.’’ 

धनगर आरक्षणासंदर्भात आधीच्या सरकारने धनगर समजाला आरक्षण मिळणारच नाही, अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र दिले होते. आम्ही त्यात बदल करून योग्य प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व ओबीसी आरक्षाचा घोळ या सरकारने वाढवला आहे. ओबीसी आरक्षणासाठी आवश्‍यक वस्तुनिष्ठ माहिती (इम्पिरिकल डाटा) गोळा करण्याचे काम तीन-चार महिन्यात होऊ शकते. या सरकारला प्रत्याक्षात काही काम करायचे नाही. राज्यातील सर्व संबंधित समाज घटकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सरकार करीत आह. त्यामुळे ते प्रत्येक कामात स्वत:ची जबाबदार झटकत केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.      
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख