राजकारणातील माझा साथीदार इतक्या लवकर सोडून जाईल, असे वाटले नव्हते : अजितदादांनी जागवल्या कार्यकर्त्याच्या आठवणी

बारामतीमधील रस्ते स्वच्छ व सुस्थितीत करण्यासाठी मी अधिकाऱ्यांच्या मदतीने दिवाळीनंतर अधिकचे लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

माळेगाव (जि. पुणे) : बारामती (Baramati) तालुक्यातील पणदरे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) हरहुन्नरी कार्यकर्ते (स्व.) दिलीपराव जगताप यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा उल्लेख करीत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अल्पशा आजाराने दिलीपराव गेले. माझ्या सुरुवातीच्या राजकारणातील साथीदार इतक्या लवकर आपल्याला सोडून जाईल, असे कधी वाटले नव्हते, अशा शब्दांत पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी उपस्थितांचे मन हेलावले. (Memories of activist awakened by Ajit Pawar)

पणदरे येथील ग्रीनफिल्ड  कृषी माॅलचे उद॒घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या सभेत अजित पवार यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणी जागवल्या. या वेळी  ग्रीनफिल्ड ॲग्रीमेक इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकिय संचालक अभिजित घोरपडे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, विश्वास देवकाते, सचिन सातव, अशोकराव जगताप, राजेंद्र जगताप, करणसिंह जगताप आदी उपस्थित होते.

Ajit Pawar
नाशिक लोकसभेसाठी संभाजीराजेंची पेरणी?; खासदार गोडसेंसमोरच मुख्यमंत्र्यांपुढे मांडले प्रलंबित प्रश्न

माझ्या सुरुवातीच्या राजकारणातील साथीदार इतक्या लवकर आपल्याला सोडून जाईल, असे कधी वाटले नव्हते. पण, आज त्यांचा मुलगा करणसिंह जगताप हा नवीन उभारलेल्या कृषी माॅलच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभा राहतो, याचा मला अभिमान वाटतो, असेही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
MCA Election : नार्वेकरांनी घेतली दुसऱ्या क्रमांकाची मते; विजयानंतर उद्धव ठाकरेंचा फोन

दिलीपराव जगताप यांच्या आठवणींना उजाळा देताना अजित पवार म्हणाले," पणदरे ग्रामपंचायत अथवा  मार्केट कमिटी आदी संस्थांच्या माध्यमातून दिलीपराव यांनी मनापासून कार्य केले. अर्थात त्यांचे बंधू अशोकराव जगताप तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनीही आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करीत कुटुंबाचा नावलौकिक कायम ठेवला आहे. ही संस्काराची शिदोरी दिलीपरावच्या मुलांना आपल्या उद्योग व्यवसायामध्ये निश्चितपणे उपयोगी ठरणार आहे.

Ajit Pawar
भास्कर जाधव चिपळूण-गुहागरमधून निवडून कसे येतात?, तेच आता बघू : दरेकरांचे चॅलेंज

रस्ते विकासामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. अर्थात ही विकासाची घौडदौड सुरू ठेवण्यासाठी रस्ते विकासाला चालना दिल्याशिवाय सर्वांगिण प्रगतीला वेग येणार  नाही, म्हणूनच आमच्या महाविकास आघाडी सरकाने रस्ते बांधणी प्रकल्पांकडे विशेष लक्ष दिले. कोट्यवधींचा निधी खर्च केला, तर आम्ही मंजूर केलेली काही कामे सध्या सुरू झाली आहेत. मात्र त्या कामांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे वाटते, अशी अपेक्षा पवार यांनी बोलून दाखवली. बारामतीमधील रस्ते स्वच्छ व सुस्थितीत करण्यासाठी मी अधिकाऱ्यांच्या मदतीने दिवाळीनंतर अधिकचे लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar
लहान भाऊ पोहायला शिकला अन्‌ मला रात्रभर झोपच लागली नाही : अजितदादांची तुफान फटकेबाजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in