Viral Memes On Maharashtra Politics: सत्ता संघर्षाचा निकाल आला अन् सोशल मिडीयावर मीम्सचा पूरही आला...

Supreme Court Decision On Maharashtra Politics Crisis: न्यायालयाच्या निर्णयानंतर सोशल मिडीयावर मात्र चांगलेच मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत
Viral memes on Maharashtra Politics:
Viral memes on Maharashtra Politics: Sarkarnama

Viral Political Memes on Social Media: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात अंतिम निर्णय देताना सर्वोच्च न्यायालायाने (Supreme Court) काही निरीक्षणे नोंदवली आहे. न्यायालयाने तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप-शिंदे गटाच्या आणि ठाकरे गटाचे कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत. (Memes go viral on social media after the outcome of the power struggle)

पण दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयानंतर सोशल मिडीयावर मात्र चांगलेच मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. '' न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय दिल्यानंतर नार्वेकरांच्या फोटोसह “कभी कभी लगता हैं अपुनीच भगवान है!” हा फिल्मी डायलॉग लिहिलेले मीम्स चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

Viral memes
Viral memes Twitter

न्यायालयाच्या निकालाचे नेटकऱ्यांकडून वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. तर अनेक मीम्सही व्हायरल होत आहे. ''मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर, एकमेकांची पसंती बेकायदेशीर, साखरपुडा बेकायदेशीर, लग्न बेकायदेशीर, हनिमुन बेकायदेशीर, पण झालेलं बाळ मात्र कायदेशीर... असा एक मजकूर सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत होता. ''

Viral memes
Viral memes Twitter

नेटकरी आपापल्या परीने निकालाचा वेगवेगळा अर्थही काढत होते. निकालाचे तात्पर्य- कितीही कठीण परिस्थिती आली तरी मैदान सोडायचं नाही. निधड्या छातीने परिस्थितीचा सामना करायचा. राजीनामा देण्याआधी दहादा विचार करावा... असाही एक मजकूर सोशल मिडीयावर फिरताना दिसत आहेत. तर 'लग्न बेकायदेशी पण संसाराला परवानगी' असंही नेटकरी म्हणत आहेत.

याशिवाय सतीश आचार्य नावाच्या एका नेटकऱ्याने शेअर केलेला एक फोटोही सध्या व्हारल होत आहे. ज्यात माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी एकीकडे गिल्टी, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर फास दिसत आहे. या फोटोला सतीशने गिल्टी बट नॉट पनिशेबल,अशी कॅप्शन दिली आहे.

सोहित मिश्रा नावाच्या व्यक्तीने महाराष्ट्रातील राजकीय पत्रकारांना लक्ष्य करुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com