मला मनसेचे सदस्य करुन घेतल्याबद्दल धन्यवाद; राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

मनसेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली
MNS Raj Thackeray
MNS Raj Thackeraysarkarnama

Raj Thackeray : पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) प्राथमिक सदस्य नोंदणीला आज पुण्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला माझी प्रथम सदस्य नोंदणी करून दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी यावेळी केली.

येथील नवी पेठमधील मनसेच्या कार्यालयात आयोजित सदस्य नोदणी अभियान उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, अजय भोसले, नगरसेवक वसंत मोरे आणि गणेश सातपुते यावेळी उपस्थित होते. मनसेच्यावतीने राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी करण्यात आली होती.

MNS Raj Thackeray
`एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी`, राज्यात मोहिम राबवणार ; कृषी मंत्र्यांची घोषणा..

राज ठाकरे यांचे ऑपरेशन झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात जमले होते. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकरे म्हणाले, "आत्तापर्यंत सदस्य नोंदणीची सुरवात मुंबईत करण्यात आली होती. मात्र, यंदा प्रथमच ती पुण्यात करण्यात येत आहे.

MNS Raj Thackeray
Aditya Thackeray | शिंदे गटाचा आंदोलनातून आदित्य ठाकरेंवर निशाणा

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार दर तीन ते चार वर्षांनी सदस्य नोंदणी करण्यात येते. महाराष्ट्रातील सर्वांना मी आव्हान करतो की, त्यांनी मनसेचे सदस्य व्हावे. जे सदस्य होतील त्यांना दर आठवड्याला पक्षाची माहिती, कार्यक्रम आणि विविध विषयांची माहिती त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात येईल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in