ब्राह्मण समाजाची विषेश महामंडळाची मागणी : मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी पवार करणार मध्यस्थी

Sharad Pawar | NCP : शरद पवार यांच्याकडून राज्यातील विविध ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले होते
Ncp Leader Sharad Pawar
Ncp Leader Sharad PawarSarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कडून राज्यातील विविध ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार पुण्यात आज १० ब्राह्मण संघटनांसोबत त्यांची बैठक पार पडली. या बैठकींमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून चर्चेदरम्यान शरद पवार यांच्यावतीने या संघटनांना काही आश्वासन देण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने ब्राह्मण समाजाच्या विषेश महामंडळासाठी मुख्यमंत्री आणि संघटनांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. (Sharad Pawar Latest News)

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून विविध संघटना आणि त्यांचे ४० पदाधिकारी आजच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत विविध मुद्दे पदाधिकाऱ्यांनी मांडले. यात एक पहिला मुद्दा तो म्हणजे त्यांच्यात एक अस्वस्थता होती. माझ्या पक्षाच्या दोन सहकाऱ्यांनी काही विधान केली. त्याबद्दल त्यांच्या मनात अस्वस्थता होती. (NCP, Sharad Pawar, Brahman Community Latetst News)

मात्र याबाबत मी त्याचवेळी स्पष्ट केले होते. आमची पक्षात चर्चा झाली आणि सर्वांना मी समज देवून सांगितले आहे. कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात बोलायचे नाही. धोरणात्मक मुद्द्यांवर आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे. कोणत्याही जाती-धर्माबद्दल वक्तव्य करु नयेत, अशी समज दिली आहे. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी याबाबत जास्त विषय वाढवला नाही.

याशिवाय बाह्मण समाजाचे आरक्षण आणि समाजासाठी विषेश महामंडळाचीही मागणी आजच्या बैठकीत करण्यात आली असल्याचे पवार यांनी सांगितले. ज्या पद्धतीने विविध जाती-धर्मासाठी महामंडळ अस्तित्वात आहे, त्याचपद्धतीने बाह्मण समाजासाठी 'परशुराम' महामंडळ असावे अशी मागणी बाह्मण संघटनांनी केली. यावर त्यांनी हा विषय आपल्या अखत्यारित येत नसून राज्य सरकारच्या अखत्यारित असल्याचे स्पष्ट केले. मात्र याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची वेळ घेवून संघटना आणि मुख्यमंत्री यांची चर्चा घडवून आणू शकतो असेही पवार यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून ब्राह्मण समाजाबाबत करण्यात आलेली वक्तव्ये आणि दुसरीकडे शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणारी मतं यामुळे दुषित झालेलं वातावरण निवळण्याचा आणि काहीशी साखरपेरणी करण्याचा प्रयत्न बैठकीच्या माध्यमातून झाला असल्याची प्रतिक्रिया काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बैठक संपल्यानंतर देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com