महापौर मोहोळ म्हणाले; पुण्यात शाळा सुरू करण्याची घाई नको

पुण्यातील आताची परिस्थिती पाहता पुण्यात आणखी किमान एक आठवडा शाळा बंद ठेवाव्यात.
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSarkarnama

पुणे : राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) आज घेतला असला तरी स्थानिक परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी किंवा महापालिका आयुक्तांनी निर्णय घ्यावेत, असे सांगण्यात आले आहे.या पाश्‍र्वभूमीवर पुण्यात रूग्णसंख्येचा रोज नवा उच्चांक होत असताना पुण्यातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय होणार का याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे.पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लगेच शाळा सुरू करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

Murlidhar Mohol
माळशिरसमधला विजय कुणा व्यक्तीचा नव्हे : भाजप पदाधिकाऱ्याचा मोहितेंना टोमणा

शैक्षणिक गुणवत्तेच्या अंगाने विचार केला तर शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र, पुण्यात आज दिवसभरात सात हजार २६४ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.कोवीड काळातला आतापर्यंतचा एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे.त्यामुळे पुण्यात निर्णय घेताना प्रशासनाला पुण्यातल्या या स्थितीची विचार करावा लागणार आहे.

Murlidhar Mohol
नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचीच `पंचाईत`, फडणवीसांचा टोला

पुण्यातील आताची परिस्थिती पाहता पुण्यात आणखी किमान एक आठवडा शाळा बंद ठेवाव्यात, अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे.पुण्यात सध्या घरटी एक व्यक्ती आजारी आहे. कोरोनाशिवाय विषाणूजन्य ताप व सर्दी खोकल्याचे प्रमाण यात मोठे आहे.त्यामुळे एक आठवड्यानंतर परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जावा, अशी पालकांची भूमिका आहे.निर्णय घेताना प्रशासनाने या गोष्टींचा विचार करावा, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

पुण्यातील कोरोनाची ॲक्टिव्ह रूग्णसंख्या ४२ हजार २६४ इतकी आहे.एक ते १८ या वयोगटातील सुमारे साडेतीनशे मुलं बाधीत झाली होती. यातील रूग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलांची संख्या ६४ इतकी आहे. त्यामुळे पुण्यातील स्थिती शाळा सुरू करण्यासारखी नसल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘ पुण्यातील वाढती रूग्णसंख्या आणि त्यात मुलांना होणारी लागण लक्षात घेता आता लगेच शाळा सुरू करण्याचा निर्णय घाईचा ठरेल. पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या आढावा बैठकीत हा मुद्दा मी आग्रहाने मांडणार आहे.’’

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com