IMG-20210730-WA0027.jpg
IMG-20210730-WA0027.jpg

महापौर मोहोळांनी केले अजित पवारांचे तोंडभरून कौतुक  

सर्वांनीच सहकार्याची भूमिका ठेवल्याने विकासाच्या कामात कुठेही राजकारण आले नाही.

पुणे : पुणे मेट्रोच्या वनाज-रामवाडी दरम्यानच्या तीन किलोमीटर अंतराची ‘ट्रायल रन’ आज पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या उपस्थितीत झाली. या कार्यक्रमात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohal) यांनी पालकमंत्री अजित पवार यांचे केलेले कौतुक चर्चेचा विषय ठरला. ठरलेल्या वेळापत्रकानुसार मेट्रोच्या कामाची प्रगती सुरू आहे हे विकासाच्या कामात राजकारण येऊ शकत नाही याचे उत्तम उदाहरण असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.या कामात पालकमंत्री अजित पवार यांचे यात मोठे योगदान असल्याचे सांगत महापौर मोहोळ यांनी अजित पवार यांचे कौतुक केले.(Mayor Mohol praised Ajit Pawar) 

महापौर मोहोळ म्हणाले, ‘‘ मेट्रोच्या कामाला गेल्या दोन वर्षात मोठी गती मिळाली आहे. वनाज-रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट हा ३५ किलोमीटरचा मार्गाचे काम गतीने सुरू आहे. नगर रस्त्याच्या मेट्रोचे विस्तारीकरण तसेच हिंजवडी व सोलापूर रस्त्याच्या मेट्रोचा विस्तार या काळात झाला. राज्यात सरकार बदलल्यानंतरही पालकमंत्री पवार यांनी संपूर्ण सहकार्य करीत मेट्रोच्या कामाला गती दिली.’’

 राज्य सरकार, केंद्र सरकार तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री अजित पवार या सर्वांनीच सहकार्याची भूमिका ठेवल्याने विकासाच्या कामात कुठेही राजकारण आले नाही. येत्या काळात याच गतीने काम होऊन हा संपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल तसेच नोव्हेंबरपर्यंत वनाज ते गरवारे महाविद्यालयापर्यंतचा पाच किलोमीटरचा मार्ग पुणेकरांसाठी खुला होईल, अशी अपेक्षा महापौर मोहोळ यांनी व्यक्त केली. 

‘एचसीएमटीआर’ रस्त्याच्या कामाला गती देऊन पुण्यात न्यूयो मेट्रोच्या व्यवहार्य प्रयोगाचा स्वीकार करण्यात यावा, असे यावेळी महापौर मोहोळ यांनी सांगितले. एचसीएमटीआर प्रकल्पाला पाच हजार दोनशे कोटी रूपये खर्च येणार असून हा प्रकल्पदेखील लवकर सुरू व्हावा, अशी अपेक्षा महापौर मोहोळ यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तसेच कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील व पुण्याचे खासदार गिरीश बापट हे ऑनलाइन सहभागी झाले होते. पाटील यांनीदेखील या कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अजित पवार यांचे अभार मानले.  
Edited By : Umesh Ghongade


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com