मावळात भातखळकरांच्या प्रतिमेस जोडे मारून केला निषेध

भाजप (BJP) नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मावळचे आमदार सुनील शेळकेंवर (Sunil Shelke) टीका केली होती.
Maval NCP
Maval NCPSarkarnama

मावळ : मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर भाजपा (BJP)आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ आज (ता.13 जानेवारी) वडगाव मावळ येथील तहसीलदार कार्यालयासमोर भातखळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Maval NCP
पाच मंत्र्यांचे डोके खाणाऱ्या वादाचा निकाल आमदार मोहितेंच्या बाजूने झुकला..

लोहगडावर उरूस साजरा करण्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी मध्ये मागील काही दिवसांपासून चांगलीच जुंपली आहे. दरम्यान भातखळकर यांनी आमदार शेळकेंनर शासनाचे नियम पायदळी तुडवल्याचा आरोप केला होता. मात्र, प्रत्यक्षात लोहगडावरील उरुसाचे जुने विडिओ व्हायरल करून बदनामी करण्याचे आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप शेळकेंनी केला आहे. तर, अभिनेत्री कंगना राणावत हिची हुजरेगिरी करणाऱ्या भातखळकरांनी चुकीचे आरोप करू नयेत. तसेच, न झालेल्या उरुसाची अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही दोन दिवसापुर्वीच त्यांनी दिला होता.

याबरोबरच शेळकेंनी भातखळकरांना आमदार असल्याने जबाबदारीने वक्तव्य करायला पाहिजे. तसेच, त्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे असून त्यांनी पुन्हा असे वक्तव्य केल्यास मावळमध्ये येऊन दाखवावे त्यांना त्यांची जागा दाखवून देवू, असे आव्हान देखील शेळकेंनी दिले होते. तसेच, प्रसारमाध्यमांनी देखील खातरजमा न करता चुकीची बातमी प्रसारित करु नये,असे आवाहन केले होते.

Maval NCP
मुंबै बॅंक : चिठ्ठी उचलली गेली आणि उपाध्यक्षपद तरी भाजपला मिळाले

दरम्यान, शेळके यांनी कोरोना काळात उरुस भरवून जातीय तेढ निर्माण केल्याने त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी भाजपचे भातखळकरनी (ता.१० जानेवारी) केली होती. तसेच, ही राष्ट्रद्रोहाचीच कृती असून त्यानुसारही शेळके विरुद्ध कारवाईसाठी भाजप प्रयत्न करेन, असे ते म्हणाले होते. याच घटनेवरून आज भातखळकराच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in