मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थिती लावत खासदार श्रीरंग बारणेंनी जपली ठाकरेनिष्ठा!

पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणारे शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी, मात्र आपण पक्ष आणि पक्षप्रमुखांसोबतच असल्याचे आज ‘सरकारनामा’शी बोलताना स्पष्ट केले
Shrirang Barne
Shrirang BarneSarkarnama

पिंपरी : शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात पक्षाच्या ५५ पैकी ४१ आमदारांनी आजपर्यंत हजेरी लावली आहे. त्यानंतर काही खासदारांनीही त्यांना समर्थन दिले आहे. त्यातूनच त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या १८ पैकी पाच खासदार हे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या `वर्षा`वरील बैठकीला हजर नव्हते. (Maval MP Shrirang Barne with Uddhav Thackeray)

दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणारे शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी, मात्र आपण पक्ष आणि पक्षप्रमुखांसोबतच असल्याचे आज ‘सरकारनामा’शी बोलताना स्पष्ट केले. हीच भूमिका शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी मांडली. शहरातील सर्व शिवसैनिक हे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा दावा त्यांनी केला. गत टर्मला शहरात तीनपैकी शिवसेनेचे ॲड. गौतम चाबूकस्वार हे एकच आमदार होते. यावेळी ते नाहीत, त्यामुळे मुंबईसह राज्य व देशभरातही शिवसेनेत चाललेल्या मोठ्या घडामोडी व उलथापालथीचे लगेच मोठे परिणाम पिंपरी-चिंचवडमध्ये दिसून आलेले नाहीत. त्याबाबत स्वतःहून कुठलाही स्थानिक नेता आपण कुणाच्या बाजूने आहे, हे सांगत नाही. व्यक्त होत नाही, असे सध्या शिवसेनेत चित्र आहे.

Shrirang Barne
राष्ट्रवादीने केली विरोधात बसण्याची तयारी!

पक्षातील बंडाविषयी ॲड. चाबूकस्वार यांना विचारले असता आमदार गेले म्हणजे शिवसैनिक गेला असे होत नाही. पक्ष संपला असे होत नाही. उलट आता जिद्दीने पेटलो असल्याने पुन्हा उभारी घेऊ, असे ते म्हणाले. तसेच, पक्ष आणि उद्धव ठाकरेंसोबतच आपण आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले. हे एक वादळ आहे. ते लवकरच शांत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच, बंड हे शिवसेनेला नवीन नाही, फक्त ते या वेळी मोठे आहे, असेही ते म्हणाले.

Shrirang Barne
भाजपची मोठी ऑफर : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, तर श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्री?

शिवसेनेतील बंडखोरीचे मोठे परिणाम औरंगाबाद, कोकण आणि विदर्भात दिसून आले असले, तरी ते पश्चिम महाराष्ट्रात त्यातही पुणे जिल्ह्यात तेवढे दिसलेले नाहीत. जिल्ह्यातील पक्षाचे एकमेव खासदार मावळचे श्रीरंग बारणे हे पक्षप्रमुखांच्या बैठकीला हजर होते. त्यातूनच समजून जा, की मी कुणाबरोबर आहे, अशी उलट विचारणा त्यांनी केली. मात्र, या बैठकीला आमदार शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत, खासदार भावना गवळी आदींसह पाच खासदार मात्र हजर नव्हते, अशी माहिती या बैठकीला हजर असलेल्या एका शिवसेना खासदाराने ‘सरकारनामा’ला आज दिली. त्यामुळे त्यातील एकाचा अपवाद वगळता बाकीचे चार हे शिंदेच्या गोटात जाण्याची शक्यता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com