
Pimpri-Chinchwad News : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय २२ आमदार हे २४ ऑगस्टला दहा दिवसांच्या युरोपच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. तेथे भाजपच्या पिंपरी-चिंचवडकर आमदार (विधानपरिषद सदस्य) उमा खापरे यांनी नव्याने राज्यातील युतीच्या (भाजप-शिंदे शिवसेना) सरकारात सामील झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाचे मावळचे (जि. पुणे) आमदार सुनील शेळके यांना प्रवासातच बसमध्ये राखी बांधून रक्षाबंधन सण बुधवारी साजरा केला.
एकमेकांचे विरोधक असलेले भाजप (आठ), कॉंग्रेस (Congress) (सहा), ठाकरे शिवसेना (एक) शिंदे शिवसेना (दोन), राष्ट्र्वादीचे (पाच) आमदार अभ्यास दौऱ्यासाठी एकत्र गेले आहेत. त्यात निम्या (११) महिला आहेत. युरोपातील महिला सक्षमीकरण, मत्स्य आणि दुग्ध व्यवसायाचा ते अभ्यास करणार आहेत. चिंचवडच्या भाजपच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांच्यासह उद्योगनगरीतीलच खापरे आणि मावळचे शेळके यांच्यासह विधानपरिषदेच्या उपसभापती पुण्यातील डॉ नीलम गोऱ्हे ( शिंदे शिवसेना ), शिरूरचे अशोक पवार (राष्ट्रवादी) आणि भोरचे संग्राम थोपटे (कॉंग्रेस) आदी युरोपमधील जर्मनी, नेदरलॅण्ड आणि इंग्लड या देशांच्या दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचे आतापर्यंतचे देश, विदेशातील हे अभ्यास दौरे हे फक्त सहल ठरले आहेत. लाखो रुपये खर्चूनही त्यातून राष्ट्रवादी सत्तेत असताना ना काही हाती आले ना नंतर भाजपच्या काळात काही रिझल्ट दिसून आला. नगरसेवक नाही, पण आमदारांच्या अभ्यास दौऱ्यातून, तरी आता काही हाती येईल, अशी आशा ज्यांच्या कररुपी पैशावर ही परदेशवारी झाली आहे, त्या महाराष्ट्रातील जनतेला लागून राहिली आहे.
दरम्यान, नेदरलॅण्डमध्ये प्रवासात असतानाच खापरे यांनी शेळकेंना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. खापरे यांना दोन सख्खे भाऊ पुणे आणि मुंबईत आहेत. तर, शेळकेंच्या दोन्ही सख्या बहिणी या पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. त्यांच्या बहिणी या रक्षाबंधनाला त्यांच्याकडे येतात. एवढेच नाही, तर दरवर्षी आठ-दहा हजार राख्या त्यांना घरी येतात. काही राख्या बांधायलाही येतात.
यावेळी, मात्र त्यांनी व खापरेंनीही परदेशात असल्याने तेथेच रक्षाबंधन साजरे केले. सुनीलभाऊंची नेहमी ताई, ताई म्हणून सहकार्याची भूमिका होती व आहे. त्यातून रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्याकडून राखी बांधून घेत बहिणीची रक्षा करण्याचे वचन घेतले, असे ट्विट खापरे यांनी रक्षाबंधनाच्या बसमधील फोटोसह केले आहे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.