Maval Bazar Committee : एका रुपयाचीही उलाढाल नसलेल्या मावळ बाजार समितीत मोठी चुरस; 'हे' आहे कारण

Maval APMC : यापूर्वी सर्व पक्षीय नेते एकत्र बसून जागा वाटून घेत होते
Sunil Shelke, Bala Bhegde
Sunil Shelke, Bala BhegdeSarkarnama

सुनील धुमाळ

Sunil Shelake and Bala Bhegade : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीमुळे स्थानिक पातळीवर राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी आमदारही उतरल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांची वार्षीक उलाढाल शेकडो कोटी रुपयांची आहे. त्या बाजार समितीवर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी बड्या नेत्यांनीही कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज अनेक वर्षांपासून ठप्प आहे. परिणामी या बाजार समितीची उलाढाल एका रुपयाचीही होत नाही. मात्र, आता तालुक्यातील दिग्गज उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाल्याचे दिसून येत आहे.

Sunil Shelke, Bala Bhegde
Vishal Phate Fraud Case in Pune : बार्शीच्या विशाल फटेची आठवण करून देणारा राठोड अद्याप सापडला नाही

मावळ तालुका बाजार समितीतील (Maval APMC) १८ संचालकांच्या जागांसाठी तब्बल १४७ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ४० अर्ज विविध कारणांनी अवैध ठरविण्यात आले. अर्ज माघारीनंतर आता १८ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजप, काँग्रेसचा एक गट, शिवसेना, आरपीआय पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज सर्व पक्षीय सहकार परिवर्तन पॅनल आहे. तर राष्ट्रवाद काँग्रेस (NCP),काँग्रेस, ठाकरे शिवसेना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष पुरस्कृत महाविकास आघाडी सहकारी पॅनेल आहे. या दोन्ही पॅनेलमध्ये थेट लढत होणार असून चार अपक्ष उमेदवारही आहेत.

Sunil Shelke, Bala Bhegde
Pune Politics : गावकारभाराची जबाबदारी बहीण-भावावर; बहीण सरपंच तर भाऊ उपसरपंच

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल १२ वर्षांनी होत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) आणि भाजप नेते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (Bala Bhegde) पुन्हा आमने-सामने आले आहेत. अनेक वर्षांपासून कामकाज ठप्प असणाऱ्या मावळ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी यापूर्वी एवढी चुरस कधी झाली नव्हती. दरम्यान, आगामी काळात विधानसभा, लोकसभा निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपंचयात व नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीला महत्व आल्याचे तालुक्यातील जाणकार सांगत आहेत.

Sunil Shelke, Bala Bhegde
Renapur Market Committee : जे लातूरला, तेच रेणापूरला ; विलासराव- गोपीनाथ मुंडेंच्या मैत्रीची पुन्हा आठवण..

तालुक्यात फक्त तांदळाचेचे उत्पन्न होत आहे. तांदळाला मिळत असलेला हमीभाव कमी आहे. त्यामुळे शेतकरी स्वतःच तांदूळ विकतात. आता जिल्हा बँकच तांदळाची खरेदी करीत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या माध्यमतून थेट अशी कोणतीच उलाढाल होत नाही. दरम्यान, यापुर्वी अनेकदा ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. सर्व पक्षातील नेते एकत्र बसून जागा वाटून घेत होते. त्यामुळे निवडणुकांसाठी कधी कुणी अर्जही दाखल केले नसल्याची माहिती तालुक्यातील जाणकारांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com