पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मारूती भापकरांसह काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मारूती भापकर हे आज आंदोलन करणार होते.
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मारूती भापकरांसह काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Maruti Bhapkar Latest Marathi NewsSarkarnama

पिंपरी : व्हीआय़पींचा पिंपरी-चिंचवड दौरा आणि शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पोलिसांनी ताब्यात घेणे (डिटेन करणे) हे आता एक समीकरणच झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथे (ता. हवेली, जि. पुणे) शिळा मंदिराच्या उदघाटनासाठी आज आले आहेत. तत्पूर्वी सकाळीच भापकरांना पिंपरी पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलं आहे. देहूतील मोदींची सभा संपल्यानंतर सायंकाळी त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. (Maruti Bhapkar Latest Marathi News)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील कार्यक्रमाच्या वेळीही भापकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आतापर्यंत आठ-दहा वेळा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अशी कारवाई केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना ही प्रतिबंधक कारवाई त्यांच्याविरुद्ध अधिकवेळा झाली आहे. तर, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना पोलिसांनी अशाप्रकारे ताब्यात घेतलेले आहे. (PM Narendra Modi in Dehu today)

Maruti Bhapkar Latest Marathi News
विद्यार्थ्याला असं तुरुंगात ठेवणं पवारांनाही आवडणार नाही! उच्च न्यायालयाचे खडे बोल

लोहमार्गालगतच्या आपल्या हद्दीतील झोपड्या हटविण्यासाठी नोटीस बजावलेल्या पिंपरी-चिंचवडमधील रेल्वेमार्गालगतच्या झोपडपट्यांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी भापकर हे पंतप्रधानांचा कार्यक्रम असलेल्या देहूमध्ये लाक्षणिक उपोषण आज करणार होते. त्यामुळे पोलिस त्यांच्या मागावर होते. सकाळीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्यानंतर पोलिस ठाण्यातच त्यांनी उपोषण सुरु केले आहे.

पोलीस ठाण्यातूनच 'सरकारनामा'शी बोलताना त्यांनी हा प्रश्न शहरातील काही हजार रहिवाशांनाच नाही तर मुंबईत लाखो आणि देशभरात काही कोटी लोकांना भेडसावतो आहे, असे सांगितले. त्यांच्या पुनर्वसनाची पिंपरी-चिंचवड महापालिका व राज्य शासनाची तयारी आहे. मात्र, केंद्र सरकार ही जबाबदारी टाळू पाहते आहे. म्हणून त्याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण करणार होतो,असे ते म्हणाले.

Maruti Bhapkar Latest Marathi News
भाजप आमदार जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; उच्च न्यायालयाचा दणका

तिन्ही यंत्रणांनी मिळून हा प्रश्न सोडविला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. एकीकडे २०३० पर्यंत सर्वांना घरे देण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे आहे त्यांची घरे काढून घ्यायची हा दुटप्पीपणा आहे, असे म्हणत नाव न घेत त्यांनी मोदींना लक्ष्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in