APMC Election : बाजार समिती निवडणूक; पंधरा पैकी राष्ट्रवादीला नऊ, तर ठाकरे गटाला केवळ एकच जागा!

Market Commitee Election : पाच जागांवर उद्या उमेदवार जाहीर होणार..
APMC Election : Market Commitee Election :
APMC Election : Market Commitee Election : Sarkarnama

Praveen Doke -

Pune Market Commitee Election : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेची निवडणूक तब्बल २० वर्षांनंतर होत आहे. या निवडणुकीत शुक्रवारी (ता.14) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने 15 पैकी 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आली.

या दहा जागांमध्ये राष्ट्रवादीला नऊ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 1 जागा देण्यात आली आहे. राहिलेल्या 5 उमेदवारांची नावे शनिवारी (ता. 15) जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी 28 एप्रिलला मतदान होणार असून, 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

APMC Election : Market Commitee Election :
Dada Bhuse News : अजित पवार अस्वस्थ, काहीही होऊ शकतं!

विकास सोसायटीच्या 11 पैकी 7 जागांचे उमेदवार निश्‍चित करण्यात आलेले आहेत. सर्वसाधारण गट शेखर सहदेव म्हस्के (कळस), संतोष आबासाहेब कांचन (उरळी कांचन), अशोक सुदाम गायकवाड (कोलवडी), योगेश बाळासाहेब शितोळे (न्हावी सांडस) यांचा समावेश आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सचिन बाळासाहेब घुले (उंड्री), महिला प्रवर्गातून सरला बाबुराव चांदेरे (बाणेर), विमुक्त जाती-भटक्‍या जमाती प्रवर्गातून अर्जून पिलाजी मदने (कोलवडी) यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

ग्रामपंचायत मतदार संघात चारपैकी तीन जागांवर उमेदवारी जाहीर झाली आहे. सर्वसाधारण गटातून महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र काळभोर (लोणी काळभोर), ठाकरे गट शिवसेनेतून रामकृष्ण हेमचंद्र सातव (वाघोली) आणि आर्थिक दुर्बल प्रवर्गातून नवनाथ रोहिदास पारगे (डोणजे) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

APMC Election : Market Commitee Election :
Bhim Jayanti : बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव कोणी? कुठे? आणि कसा साजरा केला?; वाचा महत्त्वपूर्ण माहिती !

बाजार समिती राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या पॅनेलचे 10 उमेदवार जाहीर केले आहेत. उद्या (शनिवार दि. 15) पाच उमेदवार जाहीर केले जातील. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सुचनेनुसार या उमेदवारी देण्यात आलेल्या आहेत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com