Maratha Reservation : तानाजी सावंत, माफी मागा ; मराठा मोर्चा संतप्त, राज्यात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही..

Maratha Reservation : ओबीसी समाजातील नेत्यांच्या पेरलेल्या गोष्टी भाषणात बोलून मराठ्यांचा बुद्धिभेद करून समाजाचे नुकसान करू नका.
tanaji sawant
tanaji sawantsarkarnama

पुणे : आरोग्यमंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) गेल्या काही दिवसांपासून सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. ते नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहत आहेत. आता त्यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त विधान करुन वाद ओढवून घेतला आहे.(tanaji sawant latest news)

".. सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली," असे सावंत म्हणाले आहेत. त्यावर आता मराठा क्रांती मोर्चाने (maratha kranti morcha) आक्रमक भूमिका घेतली आहे. "तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागावी,अन्यथा महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

समाज माध्यमांवर सावंतांनी केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली जात आहे. "आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली," असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे.

सावंत शनिवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मेळाव्यात बोलत होते. सध्या त्यांच्या या विधानाची चर्चा जोरदार सुरु आहे. यावरुन राजकारण तापलं आहे. मराठा क्रांती मोर्चोचे राज्य समन्वयक योगेश केदार यांनी याबाबत फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सावंताना इशारा दिला आहे.

"मंत्री सावंत यांनी आधी सकल मराठा समाजाची माफी मागावी. तानाजी सावंत यांनी मराठा समाजाने ओबीसी आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना तारतम्य बाळगावे. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का? जर तुम्हाला उघड समाजाच्या भूमिकेसोबत येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका. आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा," असे योगेश केदार यांनी म्हटलं आहे.

tanaji sawant
फडणवीसांचे ‘मिंधे’ गोधड्या भिजवत होते तेव्हापासून बाळासाहेब शिवतीर्थावरून विचारांचं सोनं उधळत होते..

योगेश केदार आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात..

आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही आहोत. 'मराठ्यांनी ओबीसी मधूनच आरक्षण' ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाचा सांगण्यावरून घेतलेली नाही. हे तुमचे सरकार आले म्हणून आम्ही आंदोलने सुरू केली असे बिन बुडाचे आरोप करू नये. अन् तुमचे सरकार आले म्हणून आंदोलन करण्याची खाज आम्हा मराठ्यांना आली इथपर्यंत बोलता ? तुम्हाला नेमकं काय वाटतंय की समाज काहीही बोलले तर सहन करेल? सत्तेची हवा एवढी पण डोक्यात जाऊ देऊ नका. आणि हो 'एस सी' मधून आरक्षण द्या अशी भूमिका मराठा समाजाने कधीच घेतली नव्हती आणि भविष्यातही कधी घेणारही नाही. त्यामुळे असले काही बोलून पत घालवून घेऊ नका.

पवार, फडणवीसांच्या विरोधातही आंदोलन केलं..

पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी सांगतो आम्ही गेल्या सरकार वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गाजर आंदोलन केले, शरद पवार साहेब यांच्या विरोधात देखील खंजीर आंदोलन केले होते. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या देखील विरोधात खंजीर आंदोलन केले. अजित दादा पवार यांना जाहीर भाषणात थांबवून ओबीसी मधूनच आरक्षण मागितले होते. त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधात असतानाही आम्ही त्यांच्या घरावर आंदोलन केले होते. हे तुम्हाला तर नक्की माहिती होते.

मराठ्यांचा बुद्धिभेद करून समाजाचे नुकसान करू नका

तुम्ही मूळ पक्ष सोडून जेव्हा गुवाहाटीला पळून गेले तेंव्हा हाच सर्वसामान्य मराठा तुमच्या बाजूने उभा होता. म्हणून तुम्ही परत आल्यावर सुखासुखी नवीन सरकार स्थापन करू शकला. आजही तुम्ही सभा घेऊ शकत आहात. जर गाव गाड्यातला अन् महाराष्ट्रातला सामान्य मराठा तुमच्या विरोधात गेला असता तर तुम्हाला कुणी जगू देखील दिलं नसतं. आज शेवटचे सांगणे आहे, तुम्हाला जर एखाद्या विषयात काही माहिती नसेल तर बोलू नका. ओबीसी समाजातील नेत्यांच्या पेरलेल्या गोष्टी भाषणात बोलून मराठ्यांचा बुद्धिभेद करून समाजाचे नुकसान करू नका. ही शेवटची विनंती? ओबीसी मधून आरक्षण हे समाजाने दोन वेळा ठेच लागल्यानंतर संविधानाला साक्षी ठेऊन घेतलेली भूमिका आहे.

फळे भोगावी लागतील..

आम्ही आजही तुमच्या बाबत सकारात्मक आहोत. पण पुन्हा जर ओबीसी आरक्षण बाबत मराठ्यांनी घेतलेल्या भूमिके बाबत काही बाही बोलायला जाल तर मग मात्र तुम्हाला त्याची फळे भोगावी लागतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com