Pune News : मोठी बातमी : मंगलदास बांदल यांना पावणेदोन वर्षांनी जामिन मंजूर

Mangaldas Bandal News : मंगलदास बांदल यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Mangaldas Bandal News
Mangaldas Bandal NewsSarkarnama

Mangaldas Bandal News : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गेली २१ महिने न्यायालयीन कोठडीत असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील अटक असलेले सर्व बँक अधिकारी व सहआरोपी यांनाही जामीन मंजूर झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

26 एप्रिल 2021 रोजी शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांच्या तक्रारीवरून बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. सहकारी बँकेतील काही अधिकाऱ्यांना सोबतीने गुन्हे घडल्याच्या तक्रावरून बांदलांसह त्यांचे काही जवळचे मित्र व काही बँक अधिकारी यांना अटक झाली होती.

Mangaldas Bandal News
Chinchwad Assembly By-election : चिंचवडमध्ये जगतापांच्या कुटुंबातीलच असणार उमेदवार...

पुढील काळात अशाच पद्धतीचे बांदल यांच्याशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. एकुण ४ गुन्हे बांदल यांच्याशी संबंधित दाखल झाले होते. या प्रकरणाशी संदर्भात आज महत्त्वपूर्ण सुनावणी उच्च न्यायालयात झाली. त्यात बांदल यांचे सह त्यांचे सर्व अटक असलेल्या सहकाऱ्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

Mangaldas Bandal News
Kasba Assembly By-election : कसब्यातून रासने, घाटे, बीडकरांऐवजी शैलेश टिळक होऊ शकतात उमेदवार

दरम्यान, न्यायालयीन आदेश अद्याप अपलोड झाला नाही. अपलोड झाल्यानंतर सर्वांची नावे जाहीर होतील. जामिन प्रक्रियेला पुढील ४ ते ५ दिवस लागतील नंतरच बांदल तुरुंगातून बाहेर येवू शकणार असल्याची माहिती त्यांची सदर केस चालविणारे वकील प्रतिनिधी अॅड अदित्य सासवडे यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in