Manchar Bazar Samiti Result : मंचर बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात !

Manchar Bazar Samiti Result : दिलीप वळसे पाटील यांचीच जादू चालते,हे पुन्हा एकदा विरोधकांना त्यांनी दाखवून दिले आहे.
Manchar Bazar Samiti Result :
Manchar Bazar Samiti Result :Sarkarnama

Manchar Bazar Samiti Result : मंचरच्या (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक (२०२३ ते २०२८) १८ जागांसाठी झालेल्यानिवडणुक पार पडली. महाविकास आघाडीने मतदानापूर्वीच तीन जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. इतर १५ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पँनलने चौदा जागा जिंकून शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना पँनलचे पानिपत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते देवदत्त निकम हे एकमेव त्यांच्या पॅनलमध्ये निवडून आले. पण त्यांच्या पँनलमधील बाकीच्या सर्व उमेदवारांचा पराभव घडून आला. १८ पैकी महाविकास आघाडीने तब्बल १७ जागांवर दणदणीत विजय मिळवला.आंबेगाव राजकारणात दिलीप वळसे पाटील यांचीच जादू चालते,हे पुन्हा एकदा विरोधकांना त्यांनी दाखवून दिले आहे.

महाविकास आघाडी, (Mahavikas Aghadi) शिवसेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटना (एकत्र), राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते देवदत्त निकम अशी येथे तिरंगी लढत झाली. कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था सर्वसाधारण सात जागांसाठी वीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते. महाविकास आघाडी विजयी उमेदवारांची नावे : सचिन पानसरे, शिवाजीराव ढोबळे, रामचंद्र गावडे, संदीप थोरात, वसंत भालेराव, गणेश वायाळ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर देवदत्त निकम.

सर्व विजेते महाविकास आघाडी : महिला प्रतिनिधी (जागा दोन) - रत्ना विकास गाडे, मयुरी नामदेव भोर, इतर मागास प्रवर्ग (एक जागा) - जयसिंग थोरात, अनुसूचित जमाती (एक जागा) - सखाराम गभाले, ग्रामपंचायत मतदार संघ (जागा दोन) - निलेश थोरात, सोमनाथ काळे, अनुसूचित जाती जमाती (जागा एक) - संदीप चपटे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (जागा एक) - अरुण बांगर, बिनविरोध निवडून आलेली महाविकास आघाडीचे उमेदवार लक्ष्मण बाणखेले, राजेंद्र भंडारी, सुनील खानदेशे.

Manchar Bazar Samiti Result :
Parli APMC Result News : धनंजय मुंडेची खेळी, शेठ पडले अन् मुनिम निवडून आले..

दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष व काँग्रेस यांची महाविकास आघाडी निवडणूकीला सामोरे गेली. ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाळासाहेब बेंडे, विष्णू हिंगे, विवेक वळसे पाटील, सुभाष मोरमारे, प्रदीप वळसे पाटील, रमेश खिलारी, प्रकाश घोलप, संतोष भोर आदि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी केली होती.

प्रथमच ठाकरे पक्षाला मयुरी भोर यांच्या माध्यमातून बाजार समितीत प्रवेश मिळाला आहे. डिंभे, घोडेगाव, मंचर या तीन मतदान केंद्रावर देवदत्त निकम हे पिछाडीवर होते. पण निरगुडसर मतदान केंद्रात त्यांनी जोरदार मुसंडी मारून विजयाचा झेंडा फडकविला. उद्योजक किसनराव उंडे, दौलत भोर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी निकम यांची प्रचार यंत्रणा समर्थपणे सांभाळली होती.

Manchar Bazar Samiti Result :
Bazar Samiti Result : बीड जिल्ह्यात बाजार समित्यांवर आघाडीची बाजी; आडसकरांनी केज राखलं

भारी तहसीलदार ए.व्ही.गवारी, नायब तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी पी.एस.रोकडे यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. त्यानंतर सर्व विजयी उमेदवार बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिलीप वळसे पाटील तर निकम यांच्या समर्थकांनी देवदत्त निकम जिंदाबादच्या घोषणा देवून भंडाराची उधळन करून जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे निकम यांच्या विजयी मिरवणुकीत शिवसेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सहभागी होते.

Manchar Bazar Samiti Result :
Kannad APMC Result News : आजी-माजी आमदारांच्या पॅनलचा धुव्वा ; जाधव-पाटलांच्या शिवशाहीला १६ जागा..

कृषी पतसंस्था मतदार संघात सचिन पानसरे यांना सर्वाधिक ४१३, शिवजीराव ढोबळे यांना ३९६, रामचंद्र गावडे यांना ३८१ व देवदत्त निकम यांना ३७९ मते मिळाली आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात निलेश थोरात यांना ४७३ व सोमनाथ काळे यांना ४४१ मते मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com